Tejasswi Prakash as Naagin in the sixth season of the show.  Google
मनोरंजन

एकता कपूर काय करेल याचा नेम नाही;कोरोनाला हरवायला आणली नागिन...

तिच्या 'नागिन 6' मालिकेचा प्रोमो पाहून लोक म्हणाले,'हद्द केलीस बाई!'

प्रणाली मोरे

एकता कपूची(Ekta Kapoor) 'नागिन 6' मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी तेजस्वी प्रकाश सज्ज झाली आहे नागिन बनून जगाला कोरोना व्हायरसच्या संकटातून वाचवायला. 'बिग बॉस सिझन 15' चे विजेतेपद पटकावल्यानंतर आता तेजस्वी हे महान काम आपल्या मालिकेतील भूमिकेच्या माध्यमातून करताना दिसणार आहे. चार महिन्याच्या प्रदिर्घ कालावधीनंतर तेजस्वी (Tejasswi Prakash) आता पुन्हा छोट्या पडद्यावर दमदार पदार्पण करीत आहे. नागिन हा छोट्या पडद्यावरचा सर्वात हीट शो आहे. या शो चा प्रोमो नुकताच वाहिनीनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या प्रोमोत तेजस्वी सोनेरी रंगाच्या पेहरावात दिसत आहे. तिनं अंगभर दागिने घातले आहेत. ती एका प्रयोगशाळेत येते जी शहरापासून खूप दूर आहे. तिथे विषारी रासायनिक द्रव्यांचा वापर करून काहीतरी प्रयोग होत असल्याचं तिला दिसतं. ज्यातनं तयार होणारी विषारी घटक हा मानवी आरोग्यासाठी हानिकारक ठरणारा असतो. त्या प्रोमोत बॅकग्राऊंडला आवाज येत आहे,''आ रही है वो,एक ऐसी साजिश से बचाने जो पूरी दुनिया मे महामारी फैला देगी. बदल रही है वो,बदल चुकी है नागिन.''

या प्रोमोवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,''आता नागिन कोरोना वॅक्सिन बनवणार की काय''. आणि पुढे स्माईली इमोजी त्यानं पोस्ट केल्या आहेत. ''नागिन कोरोनापासून वाचवणार,हद्द झाली आता''. पण बिग बॉस विनर तेजस्वी प्रकाशला मात्र तिच्या या नव्या भूमिकेबद्दल काहींनी शुभेच्छा दिल्या आहेत. तेजस्वी प्रकाश बिग बॉस १५ ची विनर ठरल्यानंतर अनेकांनी ''हे ठरलेलं होतं'' अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या. तेजस्वी कलर्स वाहिनीसोबत 'नागिन ६' हा शो करीत असल्यामुळे तिला बिग बॉस मध्ये जिंकवण्यात आल्याचं बोललं गेलं. त्या सर्व विधानांना तेजस्वीनंही तिच्या रोखठोक भाषेत प्रत्युत्तर केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT