twinkle khanna insulted Akshay Kumar at book launch event mumbai Esakal
मनोरंजन

Akshay Kumar: बायकोनं केला अपमान! अक्षय कुमारच्याबाबत असं घडलं तरी काय?

अक्षय कुमारचा चारचौघात ट्विंकलने अपमान केल्याची गोष्ट घडली आहे

Devendra Jadhav

मुंबईत ट्विंकल खन्नाच्या पुस्तकाचा बुकलॉंच सोहळा झाला. ट्विंकल खन्नाने तिचे दुसरे पुस्तक 'वेलकम टू पॅराडाईज' लाँच केले. लॉन्चिंगला काही बॉलीवूड स्टार्स उपस्थित होते ज्यांनी तिचे अभिनंदन केले.

बुकलाँचच्या वेळी घडलेल्या एका घटनेने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. क्लिपमध्ये अक्षय कुमार आपल्या पत्नीचा ऑटोग्राफ घेण्यासाठी पुढे येताना दिसत आहे. मात्र, ट्विंकलचा असे काही केले की अक्षयचा सर्वांसमोर अपमान झाला. जाणून घ्या काय घडलं.

(twinkle khanna insulted Akshay Kumar at book launch event mumbai)

बॉलीवूडचा 'खिलाडी' बायकोच्या बुकलॉंचच्या वेळी उपस्थित होता. अक्षय कुमार काळ्या रंगाच्या कपड्यात देखणा दिसत होता. पुस्तकाच्या लाँचिंगचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असताना. अशातच अक्षयचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय.

एका क्लिपमध्ये अक्षय पुस्तक घेऊन खुर्चीवर बसलेल्या ट्विंकलच्या जवळ जाताना दिसत आहे. तो तिचा ऑटोग्राफ घेण्यासाठी पुस्तक टेबलावर ठेवतो. ज्यावर ट्विंकल उत्तर देते, “तू हे फक्त फोटोसाठी करत आहेस,” आणि अक्षय हसतो आणि मागे वळतो.

अक्षय जरी हसून मागे वळला असला तरीही त्याचा चेहरा पडलेला दिसतो. या व्हिडीओवर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांना ट्विंकल अक्षयसोबत जे वागली ते आवडलं नाहीय.

या बुकलॉंचच्या वेळी अक्षय आणि डिंपलची उपस्थिती विशेष ठरली. इव्हेंटमध्ये दोघेही गप्पा मारताना दिसले. जावई आणि सासूने एकमेकांशी मनमुराद गप्पा मारल्या. त्यांच्या जोडीला जॅकी श्रॉफ सुद्धा दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Election : महायुती विरुद्ध महायुती सामना; कोल्हापूरच्या प्रभाग ९ मध्ये माजी नगरसेवकांची प्रतिष्ठेची लढत

Latest Marathi News Live Update : नाशिक पोलिस अकादमीमध्ये दीक्षान्त संचलन

BMC Election: मुंबईचं राजकारण हादरलं! उद्धव–राज ठाकरे युतीचा गुप्त फॉर्म्युला समोर, थेट संघर्ष होणार... महायुतीची तातडीची बैठक!

Shirdi News:'टी-२० विश्वकप विजेत्या अंध खेळाडू साईचरणी लीन'; जिंकून आणलेला चषक साई समाधीवर ठेवले!

चारित्र्याच्या संशयावरुन भयंकर शेवट; सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीने बँकर पत्नीची गोळ्या झाडून केली हत्या, दोन मुलं असतानाही उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT