Twitter users Accuses Kangana Ranaut Of Nepotism As Brother Becomes Part Of Production House 
मनोरंजन

कंगणाचा आरोप तिच्यावरच उलटला, बहिण रंगोलीला करावी लागतेय सारवासारव

वृत्तसंस्था

मुंबई : बॉलिवूडमध्ये सर्वात बोल्ड आणि मते परखडपणे मांडणारी अशी ओळख असणारी अभिनेत्री म्हणजे कंगणा रणौत. आपली मते केवळ ब़ॉलिवूडपर्यंत मर्य़ादित न ठेवता तितच्याच परखडपणे ती इतर विषयही मांडते. कंगणाला साथ देण्यासाठी तिची बहिण रंगोली चांडेल नेहमीच पुढे असते. परखड मतांमुळे अनेकदा या बहिणींना विरोधाचा सामना करावा लागला आहे. सध्या कंगणाला काही युजरनी ट्रोल केलं आहे. जाणून घ्या बॉलिवूडच्या 'क्विन' ला का ट्रोल करत आहेत.

कंगणाने घेतली नवी इमारत 
बी-टाउनमध्ये 'क्वीन' म्हणूनच ओळख असणारी कंगणा रणावत. या क्विनने बॉलिवूडमध्ये स्वत:च्या बळावर तिचं अस्तित्व निर्माण केलं आहे. ज्या मुंबईमध्ये घर घेणं स्वप्न असतं तिथे कंगणाने इमारत विकत घेतली आहे.

मुंबईच्य़ा पाली हिल परिसरात कंगणाने एका दिमाखेदार इमारत विकत घेतली आहे. त्याचे फोटो कंगणाची बहिण रंगोली हिने ट्विटरवर शेअर केले आहेत. हे ट्विट करताना तिने बाकीच्या कलाकारांना टोला दिला आहे. रंगोलीने ट्विटमध्ये लिहिलं आहे, ' मुंबईच्या पाली परिसरातील हे अपार्टमेंट कंगणाने तिच्या स्टुडिओसाठी घेतलं आहे. याचं स्वप्न तिनं 10 वर्षांपूर्वी पाहिलं होतं. कोणत्याही अवॉर्ड फंक्शनला न जाता, कोणत्याही चिंधी ब्रॅंडची जाहिरात न करता किंवा कोणाच्याही लग्नामध्ये न नाचता तिने हे यश संपादन केलयं.''

काय आहे हा वाद ? 
कंगणाची बहिण रंगोलीने ट्विट करत तिचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. तिचा भाऊ अक्षित हे स्टुडिओ सांभाळणार आहे. कंगणा 'नेपोटिझम' च्या विषयी नेहमीच खुलेपणाने बोलते. पण आता याच नेपोटिझमचा आरोप कंगणावर करण्यात येतोय. ट्विटरच्या काही युजरनी तिला नेपोटिझमच्या मुद्द्यावरुन सुनावलं आहे. कंगणाचा भाऊ अक्षत तिच्यासोबत काम करणार आहे. स्वत: सोबत आता तिने भावालाही इन्चडस्ट्रीमध्ये आणलं असल्याचा आरोप या युजरने केला आहे. या सर्व प्रकरणावर कंगणाने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, बहिण रंगोलीने कडक शब्दांत या य़ुजरना रिप्लाय दिला आहे. 

दरम्यान 'मिड डे' च्या वृत्तपत्रात कंगणाविषयी आणि तिच्या नवीन इमारतीविषयी छापून आलेल्या बातमीमध्ये त्यांनी नेपोटिझमविषयी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावर रंगोलीने उत्तर दिलयं. ''कंगणा आणि अक्षत यांनी मिळून ही फर्म सुरु केली आहे. आधी त्यांना यशस्वी होऊदे मग, खुशाल नेपोटिझमचा टॅग लावा. गाव बसां नहीं के डाकू आ गये'', असा रिप्लाय तिने केला आहे. 

2006 मध्ये 'गॅंगस्टर' या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून नाव कमावलं. तिला अभिनय क्षेत्रात 15 वर्षे पूर्ण झाली असून आता ती दिग्दर्शन क्षेत्रातही उतरली आहे. मागिल वर्षी हिट ठरलेल्या 'मणिकर्णिका' या चित्रपटाचं दिग्दर्शनही तिनेच केलं होतं. चित्रपट निर्मिती क्षेत्रात आता ती पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. एक पाऊल पुढे टाकत ती 'मणिकर्णिका फिल्‍म्‍स' या संस्थेची निर्मिती करत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT