ukrainian model anastasia pokreshchuk world biggest cheeks has shared a picture before cosmetic surgeries 
मनोरंजन

अरारारा, मॉडेलला सर्जरीची हौस नडली, चेह-याचं केलं मातेरं

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - आपण चांगल दिसावं असं कुणाला वाटत नाही, प्रत्येकाची तशी इच्छा असते. त्यासाठी त्या व्यक्ती स्वतच्या शरीराशी वाट्टेल तसा प्रयोग करतात. जगातील अशा अनेक सेलिब्रेटींची उदाहरणे देता येतील की त्यांनी सुंदर दिसण्याच्या हव्यासापोटी स्वतच्या चेह-यांच नुकसान करुन घेतलं आहे. जगप्रसिध्द गायक, नर्तक मायकेल जॅक्सननं ही सर्जरी केली होती. त्यामुळे तो ही चर्चेत आला होता. त्यावरुन त्याच्यावर टीकाही झाली होता. असाच एक प्रकार रशियाच्या मॉडेलनं केला आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. सोशल मीडियावरुनही तिच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. त्या मॉडेलनं आपला फोटो सोशल मीडिय़ावर व्हायरलं केला आहे.

अनास्तासिया पोक्रेशचुक (Anastasia Pokreshchuk) असे त्या युक्रेनच्या मॉडेलचं नाव आहे. तिनं आपल्या गालावर शस्त्रक्रिया करुन घेतली आहे. यामुळे तिचा लुक भलताच अग्ली दिसत असल्याचे नेटक-यांनी म्हटले आहे. वास्तविक या मॉडेलचा जुना फोटो पाहिला तर त्यात ती कमालीची सुंदर दिसते आहे. मात्र ज्यावेळी तिनं शस्त्रक्रिया करुन घेतली तेव्हा तिच्या चेह-याचे स्वरुपच बदलून गेल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होताना दिसत आहे. सध्या सर्वाधिक मोठे गाल असणारी मॉडेल म्हणून तिनं वेगळी ओळख तयार केली आहे.

अनास्तासिया ही आता तिच्या मोठ्या गाल आणि ओठांमुळे प्रसिध्द झाली आहे. ती 32 वर्षांची आहे. तिला अशाप्रकारचा लुक करण्यासाठी सहा वर्षे लागली आहेत. अनास्तासियाचा असा दावा आहे की, तिचे गाल जगात सर्वात मोठे आहेत. तिनं आपल्या नव्या रुपाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावरुन ती चर्चेत तर आली आहेच मात्र अनेकांच्या चेष्टेचा विषयही झाली आहे. तिनं ज्याप्रकारे कॉस्मॅटिक सर्जरी केली आहे त्यामुळे तिचा चेहरा पूर्वीच्या तुलनेत अधिक विचित्र दिसु लागला आहे.

अनास्तासियानं अशाप्रकारचा लुक तयार करण्यासाठी 2 हजार 100 डॉलर खर्च केले आहेत. तिनं कशाप्रकारे आपल्या शरीरावर प्रयोग केले आहेत ते पाहायचे असल्यास तिचे फोटो पाहता येतील. याशिवाय अनास्तासिया सोशल मीडियावर अधिक सक्रिय असणारी सेलिब्रेटी आहे. 
 
 

 
   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

SCROLL FOR NEXT