Rohit Shetty Sakal
मनोरंजन

Khatron Ke Khiladi 13: 'या' टीव्ही अभिनेत्रीने मजबुरीने 'खतरों के खिलाडी 13'ला दिला नकार, काय आहे नेमकं कारण?

सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने रोहित शेट्टीने होस्ट केलेल्या 'खतरों के खिलाडी 13' या स्टंटवर आधारित शोची ऑफर नाकारली आहे.

Aishwarya Musale

स्टंटवर आधारित रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी 13' लवकरच धूम ठोकणार आहे. शोचे अनेक अपडेट्स येत आहेत. स्पर्धकांच्या यादीत काही स्टार्सची नावे निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे, तर काहींच्या ऑफर नाकारल्याची बाब समोर येत आहे. आता आणखी एका टीव्ही अभिनेत्रीने 'खतरों के खिलाडी 13'ला नकार दिल्याची बातमी आहे.

'झांसी की रानी' फेम उल्का गुप्ताला 'खतरों के खिलाडी 13' मधून ऑफर मिळाली होती आणि तिला स्वतःही या शोचा भाग व्हायचे होते, परंतु तिला शो नाकारणे भाग पडले. अभिनेत्रीने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या लेटेस्ट मुलाखतीत याची पुष्टी केली आहे. उल्का म्हणाली, "होय, मला 'खतरों के खिलाडी'ची ऑफर मिळाली होती, पण तारखेच्या कारणामुळे मी ते करू शकत नाही, पण भविष्यात मला या शोचा भाग व्हायला आवडेल."

उल्का गुप्ता पुढे म्हणाली, “मला अॅक्शन आवडते. मला सर्व टास्क करता येतील की नाही हे पहायचे आहे. माझ्या आयुष्यात फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. मी रोज व्यायाम करते. मी माझे स्वतःचे लक्ष्य बनवते. उल्कापूर्वी प्रियंका चहर चौधरीने शो नाकारल्याची बातमी समोर आली होती. उल्का शेवटची 'बन्नी चाउ होम डिलिव्हरी'मध्ये दिसली होती.

रोहित शेट्टीने होस्ट केलेल्या 'खतरों के खिलाडी 13'चे शूटिंग अर्जेंटिनामध्ये लवकरच सुरू होणार आहे. वृत्तानुसार, हा शो 17 जुलै 2023 पासून प्रसारित होणार आहे. अर्चना गौतम, सौंदर्या शर्मा, मुनावर फारुकी, अंजली अरोरा, शिव ठाकरे यांसारख्या स्टार्सची नावे स्पर्धकांच्या यादीत दिसत आहेत. आत्तापर्यंत, तारीख आणि स्पर्धकांची यादी अद्याप निश्चित झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण! उच्चांकापासून ₹31,000 स्वस्त; दसऱ्याआधी किती रुपयांना विकलं जातंय सोनं?

IND vs WI 1st T20I: वैभव सूर्यवंशीला आज संधी मिळणार का? भारतीय प्रशिक्षकाने दिले महत्त्वाचे अडेट्स; म्हणाला...

‘मला पाहून महिला थुंकायला आणि चपलेने मारायला यायच्या’; दृश्यममधील गायतोंडे फेम कमलेश सावंत म्हणाले...‘ही खंत आयुष्यभर राहील’

Marathi News Live Updates: महायुतीत बंडखोरीचे सत्र सुरूच; शेखर भोयर यांच्यानंतर भाजपच्या डॉ. संगीता शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Kolhapur Gokul Election: ‘गोकुळ’च्या एका जागेवरून महायुतीत तिढा; राष्ट्रवादीला आणखी एक जागा, यड्रावकर गटाच्या जागेवरून घमासान

SCROLL FOR NEXT