umesh kamat and priya bapat doing sky diving in australia on jar tarchi goshta natak SAKAL
मनोरंजन

Umesh Kamat Priya Bapat: "माझे हातपाय गळून गेले", उमेशने बायकोच्या मदतीने परदेशात केली आजवर कधीही न केलेली गोष्ट

उमेशने सोशल मीडियावर आजवर कधीही न केलेल्या भन्नाट गोष्टीचा अनुभव शेअर केलाय

Devendra Jadhav

उमेश कामत - प्रिया बापट हे मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील कपल. प्रिया - उमेश सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय असतात. प्रिया - उमेश यांनी नुकतंच ऑस्ट्रेलियाला आजवर कधीही न घेतलेल्या गोष्टीचा भन्नाट अनुभव घेतला.

उमेशने सोशल मीडियावर या अनुभवाचा भन्नाट व्हिडीओ शेअर करत सर्वांसोबत ही माहिती शेअर केली. याशिवाय हा अनुभव घेताना त्याची झालेली मानसिक अवस्थाही त्याने सांगितली आहे. वाचा सविस्तर.

(umesh kamat and priya bapat doing sky diving in australia)

उमेश - प्रियाने सोशल मीडियावर स्काय डायव्हिंगचा भन्नाट अनुभव शेअर केला. स्काय डायव्हिंगचा व्हिडीओ शेअर करत उमेश लिहीतो, "मला आयुष्यात कधी वाटलं नव्हत मी कधी skydive करण्याचा विचार सुद्धा करू शकेन. मला उंचीची भयंकर भिती वाटते, height fobia म्हणतात ते काय ते. साध्या इमारतीच्या गच्चीवरून खाली बघितलं तरी हातपाय गळून जातात. म्हणूनच आयुष्यात एकच काय तो treck केला आणि शपथ घेतली परत कधीही trekking च्या वगैरे भानगडीत पडायचं नाही."

उमेश पुढे सांगतो, "आमचा Australia दौरा ठरला तेव्हा 4 दिवस trip extend करायचं ठरवलं. पण planning करायला फारसा वेळ नाही मिळाला. तरी skydive हा विचार दूर दूर पर्यन्त नव्हता, पाण्याची भिती नसल्याने scuba dive करायचं मी आणि प्रियाने ठरवलं. पण वेळेच्या अभावामुळे Queensland ला जाउन scuba करणं अवघड दिसायला लागलं.
आणि अचानक एक दिवस कळलं आशुतोष ने Australia दौऱ्यावर skydive च booking केलय.प्रिया excite झाली तिने ठरवलं ती पण करणार आणि तिने मला विचारलं तू पण कर ना. तेव्हा booking साठी सगळे पैसे भरायचे नव्हते,आणि मी त्या मोहाला बळी पडलो,म्हटलं आता हो म्हणू नंतर माघार घेउ. पण तो दिवस आणि skydive झाल्यावरचा आजचा दिवस....मी माझी भिती घालवण्यासाठी केलेला प्रयत्न हा अविस्मरणीय अनुभव होता."

उमेशने हा अनुभव देण्यासाठी बायको प्रियाचे आभार मानले. उमेश लिहीतो, "मला हे करण्यासाठी confidence देणाऱ्या सगळ्यांना मनापासून Thank you पण Special Thank you and lots of love to प्रिया आणि आशु, त्यांना माझी भिती माहीत होती पण मी हा अनुभव घ्यावा अशीही मनापासून इच्छा होती. पण मला force न करता, हळूच मधे मधे confidence देत माझ्या nervousness ला confidence मधे बदललं म्हणून Thank you."

एकूणच प्रिया - उमेशचा अनुभव ऐकून डर के आगे जीत है असंच म्हणावं लागेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT