Akshay Waghmare post  Team esakal
मनोरंजन

अंडरवर्ल्ड डॉन 'डॅडी' झाले 'आजोबा'

एक बाबा म्हणून मी माझा प्रवास सुरु करणार आहे आणि त्यासाठी मी खूपच उत्सुक आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - अभिनेता अक्षय वाघमारे (akshay waghmare) आणि योगिता गवळी (yogita gawali) यांनी आनंदाची बातमी दिली आहे. ती म्हणजे अक्षय आणि योगिताच्या घरात चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे. योगिताने एका कन्येला जन्म दिला आहे. बाळाचा जन्म मुंबईतील दादर येथील एका नर्सिंग होममध्ये झाला आहे. योगिता ही ‘डॅडी’ (daddy) अर्थात गँगस्टर अरुण गवळी (gangster arun gawali) यांची मुलगी आहे. त्यामुळे अरुण गवळी आजोबा झाले आहेत. अक्षय आणि योगितासह त्यांच्या सर्व कुटुंबीयांमध्ये या नव्या पाहुणीच्या आगमनामुळे आनंदाचे वातावरण आहे.

मागील वर्षी मे महिन्यात अक्षय (akshay waghmare) आणि योगिताचे लग्न झाले होते. बाबा झाल्यावर प्रतिक्रिया देताना अक्षयच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. तो म्हणाला, की मला इतका आनंद झाला आहे की तो मी शब्दात मांडू शकत नाही.

एक बाबा म्हणून मी माझा प्रवास सुरु करणार आहे आणि त्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. बाळ आणि योगिता दोघेही सुखरूप आहेत. आमच्या कुटुंबात नवीन सदस्य आल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. इतकेच नव्हे तर बाळाचे नाव काय ठेवणार अशा प्रश्नांनी भंडावून सोडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT