uorfi javed: Esakal
मनोरंजन

uorfi javed: उर्फीला पाहून अर्जुन कपूरलाही तिच्या सोबत फोटो काढण्याचा मोह आवरेना.. नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

सकाळ डिजिटल टीम

उर्फी जावेद हे सध्या सोशल मिडियावर चर्चेत असणार नावं आहे. सोशल मिडिया सुरु करताच तिचे व्हिडिओ किंवा फोटो तुम्हाला नक्कीच दिसत असतील. त्यातच तिच्या फॅशनची तर चर्चाच नको. ती कधी काय परिधान करुन येईल याचा काही भरोसा नाही.

नुकतच उर्फीला डिझायनर अबू जानी-संदीप खोसला यांच्या पार्टीत स्पॉट करण्यात आलं होतं. या पार्टीचेही अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात उर्फीचाही व्हिडिओ आहे. लेटेस्ट व्हिडिओमध्ये उर्फी अर्जुन कपूरसोबत दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये अर्जुन कपूर उर्फी जावेदसोबत खुप फ्रेंडली दिसत आहे. हा व्हिडिओ पापाराझीनी त्याच्या अकाऊंटवर शेअर केला आहे ज्यामध्ये अर्जुन कपूर उर्फीशी बोलताना आणि कॅमेऱ्यासमोर एकत्र पोज देताना दिसत आहे. ती अर्जुनसोबत बोलतांना खुपच गोंधळलेली दिसली.

आता या व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत. एकाने सांगितले की, अभिनेत्यासोबत फोटो हे उर्फीसाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे. तर काहींनी उर्फीला तिच्या ड्रेसमुळे ट्रोल केले तर काहींनी तिला नागिनचं म्हटले आहे. हा व्हिडीओ गौरव गुप्ता फॅशन स्टोअर लाँचवेळीचा आहे, जिथे अर्जुन कपूर, मंदिरा बेदी, उर्फी जावेद आणि इतर अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते.

बॉलीवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू जानी-संदीप खोसला यांच्या पार्टीत गुरुवारी मुंबईत त्यांच्या नवीन फॅशन फिल्म 'मेरा नूर है मशहूर'चा प्रीमियर वेळीही उर्फी जावेद दिसली होती.त्यावेळी पापाराझी उर्फीचे फोटो काढत असतांनाच तिथे दिवंगत स्टार इरफान खानचा मुलगा बाबिल खानही दिसला. तिनं त्याचे कौतुक केले मात्र यावेळी त्यानं उर्फीकडे साफ दुर्लक्ष केलं होतं. हा व्हिडिओही सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT