Urfi Javed Esakal
मनोरंजन

Urfi Javed: उर्फी पोहोचली चक्क वांद्रे पोलीस ठाण्यात, काय आहे नेमकं कारण?

Urfi Javed at bandra police station: टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद नुकतीच पोलिस स्टेशनमध्ये स्पॉट झाली. उर्फी जावेदचे नवीन फोटो आणि व्हिडिओ सोशल व्हायरल होत आहेत.

Vaishali Patil

Urfi Javed at bandra police station: आपल्या अतरंगी फॅशनमुळे लाइमलाईटमध्ये राहणारी उर्फी जावेद ही नेहमीत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी तिच्या व्हिडिओमुळे तर कधी तिच्या लूकमुळे उर्फीची चर्चा मात्र रंगतेच. मात्र यावेळी उर्फी चर्चेत आली आहे ती वेगळ्याच कारणामुळे.

उर्फी जावेद ही नुकतीच वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये दिसली आहे. सध्या तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात ती पोलिस स्टेशनमधून बाहेर पडताना दिसत आहे.

सार्वजनिक ठिकाणी 'आक्षेपार्ह' पोशाख परिधान केल्याबद्दल तिच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर ओटीटी फेम उर्फी जावेदने सोमवारी (२३ ऑक्टोबर) वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये हजर झाली होती.

मात्र यावेळी देखील उर्फीच्या फॅशनने सर्वांचे लक्ष वेधले. तिच्या ड्रेसवर लिहिले होते 'कॅचिंग द डॉन...' यावेळी उर्फीनं कट-आउट जीन्स आणि पीच टी-शर्ट घातला होता. यासोबत परिधान केलेल्या ब्लेझरने लक्ष वेधून घेतले होते ज्यावर तिने तिला ट्रोल करणाऱ्यांसाठी संदेश लिहिला आहे.

सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यावर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. नेमकं काय प्रकरण आहे. उर्फी पोलिस स्टेशनला का गेली? उर्फीला तुरुंगात टाकलं का? अशा अनेक कमेंट तिच्या व्हिडिओला येत आहेत.

तर अनेकांनी तिच्या व्हिडिओला मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एकानं लिहिले की, 'तिच्या अर्ध्या चोरी गेलेल्या जीन्सची तक्रार करायला ती आली असेल', तर एका यूजरने लिहिले आहे की, 'अ लेडी डॉन उर्फी जावेद.'

उर्फी जावेदवर तिच्या लूक आणि ड्रेसिंग सेन्ससाठी अनेकदा टीका झाली आहे. मात्र, उर्फी जावेदला या गोष्टींची पर्वा नाही. उर्फी जावेदने टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. उर्फी जावेद आता मालिकांमध्ये दिसत नसून ती रिअॅलिटी शो करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT