Urfi Javed Latest News Urfi Javed Latest News
मनोरंजन

कॅमेरा पाहून उर्फी लागली पळू; युजर्स म्हणाले, पहिल्यांदा हिचा व्हिडिओ आवडला

काही वेळांनी उर्फी जावेद फोटोग्राफरशी बोलू लागली

सकाळ डिजिटल टीम

Urfi Javed Latest News बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) नुकतीच डॉक्टरांच्या क्लिनिकच्या बाहेर दिसली. उर्फी जावेद मेकअपशिवाय (Without Makeup) होती. कॅमेरा पाहून ती पळू लागली. तिने फोन व हातांनी चेहरा लपवायला सुरुवात केली. पापाराझींनी चेहऱ्यावर काय झाले? असे विचारले तेव्हा उर्फी जावेदने सांगितले की, तिचा चेहरा चमकत (ग्लो) आहे. उर्फी जावेद मेकअपशिवाय खूप अस्वस्थ वाटत होती.

काही वेळ चेहरा लपवून इकडे-तिकडे धावल्यानंतर उर्फी जावेद (Urfi Javed) थांबली आणि फोटोग्राफरशी बोलू लागली. काही सेकंदानंतर तिने फोटोग्राफरला म्हटले, चला आता खूब झाले. यानंतर फोटोग्राफरने कॅमेरा बंद केला. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. अनेक युजर्सनी व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.

वेशभूषा आणि विधानांमुळे ट्रोल होणारी अभिनेत्री उर्फी जावेदच्या व्हिडिओवर एका युजरने लिहिले, पैसा संपला?. दुसऱ्याने लिहिले की, पहिल्यांदाच हिचा व्हिडिओ आवडला आहे. अनेक युजर्सनी उर्फी जावेदच्या नो मेकअप लुकचे कौतुक केले आहे. ती मेकअपशिवाय (Without Makeup) चांगली दिसते असेही लिहिले आहे. व्हिडिओमध्ये उर्फी जावेद फक्त काजळ लावून असल्याची दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Asian Games 2026: माशी शिंकली! भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूची माघार; IND vs AFG सामन्यात ४ षटकं फेकली अन्...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

SCROLL FOR NEXT