Urfi Javed Esakal
मनोरंजन

Urfi Javed: तुम्ही मागवत असाल झोमॅटोवरुन जेवण..उर्फीतर तिथूनही मागवते ड्रेस...

सकाळ डिजिटल टीम

उर्फी जावेद हे सोशल मिडियावरच व्हायरल झालेलं नाव आहे. ती नेहमी तिच्या बोल्ड आणि बिनधास्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. उर्फी जावेद ही तिच्या कामापेक्षा जास्त तिच्या फॅशन आणि वादामुळं जास्त चर्चेत असते. कोणी कितीही बोला , विरोध करा किंवा ट्रोल करा ती काही तिची फॅशन दाखवणं बंद करणार नाही.

काही दिवसांपुर्वी उर्फी जावेदला मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये एंट्री देण्यात आली नाही, यामुळे ती संतापली आणि तिने आपला राग सोशल मीडियावर काढला. तिच्या कपड्यामुळे तिला प्रवेश नाकारला असंही तिने सांगितलं होत. त्यानंतर तिने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट टाकली आहे, जी व्हायरल झाली आहे. यात तिने Zomato ला टॅग केले होते.

त्यानंतर झोमॅटोच्या वतीने उर्फी जावेदसोबत संवाद साधण्यात आला असल्याच दिसलं. तिने त्याच्याकडे तक्रार केली की त्याच्या ऑफरमुळे ती रेस्टॉरंटमध्ये बसू शकत नाही. यावेळी त्याच्यावतीने उर्फीची माफीही मागण्यात आली होती.

त्याचबरोबर तिला एक गिफ्टही देण्यात आलं. तिला गिफ्ट बास्केट पाठवण्यात आली होती. मात्र उर्फी ही कोणती गोष्ट योग्यरित्या करेल. तिने यातही तिच्या फॅशनचा नमुना दाखवला. झोमॅटोने ज्यावेळी तिला बास्केट दिली त्यावेळी तिने त्यांना ड्रेस दिल्याबद्दल धन्यवाद म्हटलं. यानंतर उर्फीने टोपलीतून सामान काढून त्याच टोपलीने तिचे अंग झाकले.

तिने पोस्टला कॅप्शन दिले, "किसी की बास्केट, किसी की ड्रेस." उर्फी जावेदची पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि नेटिझन्सनी उर्फीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

हा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनीही डोक्याला हात लावला आहे. मात्र हे काही नवीन नाही उर्फी कोणत्याही गोष्टीपासून ड्रेस तयार करु शकते. आत्तापर्यंत लोकांनी उर्फी जावेदला पोत्यापासून ब्लेड, लोखंडी साखळी, इलेक्ट्रिक वायर ते मोबाइल सिम, काच सायकलची चेन, चिमटे इतकच नाही तर किवी च्या फळापासून बनवलेल्या ड्रेसमध्ये पाहिले आहे.



सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

Latest Marathi News Live Update : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर

Somnath Suryawanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SCROLL FOR NEXT