Urfi Javed Chahat Khanna Latest News Urfi Javed Chahat Khanna Latest News
मनोरंजन

माजी नवऱ्याचे पैसे BFवर उडवतेय; उर्फीने चाहतला मारला टोमणा

उर्फीची प्रकृती काही दिवसांपासून खराब आहे

सकाळ डिजिटल टीम

Urfi Javed Chahat Khanna Latest News उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या आउटफिट्समुळे खूप चर्चेत असते. बोल्ड स्टाईलने ती वादात सापडते. तसेच प्रत्येकवेळी ती समोरच्या व्यक्तीला असे उत्तर देते की, वाद होत असते. अलीकडे उर्फीचा चाहत खन्नासोबत (Urfi Javed) वाद झाला होता. चाहत खन्नाने उर्फीबद्दल पोस्ट करून कपड्यांबद्दल आणि बोल्डनेसबद्दल ट्रोल केले होते. आता उर्फीने चाहतचा घटस्फोट आणि बॉयफ्रेंडबद्दल (boyfriend) ट्रोल केले आहे.

चाहत खन्नाने (Urfi Javed) नुकतेच मुलाखतीत सांगितले की, काही महिन्यांपासून ती उर्फीचे फोटो आणि व्हिडिओ पाहत होती. सहन होत नव्हते म्हणून तिने उर्फीबद्दल पोस्ट केले होते. आता उर्फीने सोशल मीडियावर पोस्टद्वारे चाहतला प्रत्युत्तर दिले आहे. उर्फीने तिचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने तोच पोशाख घातला आहे जो तिला ट्रोल करताना घातला होता.

‘उर्फीने कपडे (Urfi Javed) घालण्याची ही घाणेरडी पद्धत काय आहे? आपली इच्छा आहे यार. घटस्फोट घेऊन आपल्या माजी नवऱ्याचे पैसे नवीन प्रियकरावर खर्च करणे चुकीचे आहे. परंतु, करणारे ते करतात यार’ असे व्हिडिओ (video) शेअर करताना उर्फीने लिहिले आहे.

उर्फी रुग्णालयात दाखल

उर्फीची प्रकृती काही दिवसांपासून खराब आहे. उलट्या आणि तापामुळे तिला नुकतेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या उर्फीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. सोशल मीडियावर उर्फीचे चाहते तिला लवकर बरे होण्यासाठी मेसेज करीत आहेत. तिने बरे होऊन पुन्हा तिचा ग्लॅमरस अवतार दाखवावा अशी कमेंट करीत आहेत.

ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर

काही दिवसांपूर्वी मुलाखतीत उर्फीने तिला कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिले होते. ‘प्रत्येकाला कपडे घालणे, मेकअप करणे आणि सुंदर दिसणे आवडते. मलाही ग्लॅमरस दिसायला आवडते. जर तुम्हाला ते आवडत नसेल तर ती तुमची समस्या आहे. तुम्हाला मदत हवी आहे’, असे उर्फी म्हणाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT