urfi javed get emotional at pre birthday celebration party sakal
मनोरंजन

Urfi Javed: प्री-बर्थडे सेलिब्रेशनवेळी उर्फीला अश्रु अनावर.. नेमकं घडलं तरी काय?

वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला उर्फी ढसाढसा रडली..

नीलेश अडसूळ

urfi javed birthday: टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये (Tv entertainment news) आपल्या हटक्या आणि बोल्ड अंदाजानं अभिनेत्री उर्फीनं मोठी लोकप्रियता मिळवली आहे. तिच्या वेगवेगळ्या लूकला चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स (Social media viral news) दिल्या आहेत. उर्फी सोशल मीडियावर झळकण्यासाठी काहीही करायला तयार असते. कधी अंगावर फुलं लावते तर कधी दोऱ्या गुंडाळते. सतत काहीतरी वेगळ्या पद्धतीचे कपडे परिधान करून ती फोटो आणि विडियो शेयर करत असते. अवघ्या दोन दिवसांवर उर्फीचा वाढदिवस आला आहे. या निमित्ताने झालेले प्री बर्थडे पार्टीमध्ये उर्फीला अश्रु अनावर झाले.

(urfi javed get emotional at pre birthday celebration party)

उर्फीचा (urfi javed) लवकरच वाढदिवस येत आहे. 15 ऑक्टोबर रोजी उर्फी आपला 25 वा वाढदिवस साजरा करणार आहे. पण वाढदिवसाआधीच सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. नुकत्याच झालेल्या तिच्या प्री-बर्थडे सेलिब्रेशन वेळी उर्फी भावूक झाल्याचं पहायला मिळालं. याचे स्क्रिनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

उर्फी क्वचितच इमोशन झालेली पहायला मिळते. उर्फीने या पार्टीचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती रडताना दिसत आहे.  प्री-बर्थडे सेलिब्रेशनमध्ये आपल्या मैत्रिणींचे प्रेम पाहून उर्फी भावूक झाली आहे. तिचे हे भावनिक क्षण सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

उर्फी जावेद टीव्ही मालिकांमध्ये आणि बिग बॉस ओटीटीमध्येही झळकली आहे. ती जवळपास रोजच चर्चेत असते. शिवाय तिच्या अतरंगी फॅशनच्या व्हिडिओ कायम व्हायरल होत असतात. सध्या उर्फी तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'हाय ही ये मजबुरी' या गाण्यामुळे चर्चेत आहे. उर्फी जावेदचे हे गाणे 1974 मध्ये रिलीज झालेल्या 'रोटी, कपडा और मकान' या चित्रपटातील गाण्याचे रिक्रिएशन आहे. या नवीन गाण्यात श्रुती राणेने तिचा आवाज दिला असून राजेश मंथन यांचे बोल आहेत. हे गाणे सारेगामा म्युझिकच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Installment : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट; जुलै महिन्याचा निधी जमा, असा चेक करा पेमेंट स्टेटस

MPSC Recruitment 2026 : MPSC चा मोठा निर्णय! औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; पोलिसांच्या चौकशीनंतर फेरपरीक्षेची घोषणा, उमेदवारांना पुन्हा द्यावी लागणार परीक्षा!

Gajanan Devkate: सरकारच्या थकीत बिलांचा बळी, कार्यालयांचे उंबरठे झिजवले पण...; देवकातेंचा हृदयद्रावक अंत, सरकारविरोधात कंत्राटदारांचा संताप

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

SCROLL FOR NEXT