Urfi Javed Gets Death Threats For Recreating Rajpal Yadav's Bhool Bhulaiyaa Look  SAKAL
मनोरंजन

Urfi Javed: "तुला भर चौकात गोळी घालू!" 'भुलभुलैया' लुक केल्याने उर्फीला मिळाली जीवे मारण्याची धमकी

उर्फीला तिच्या नवीन लुकमुळे जीवे मारण्याची धमकी मिळालीय

Devendra Jadhav

Urfi Javed Death Threats: उर्फी जावेद कधी काय करेल याचा काही नेम नाही. उर्फी सातत्याने तिच्या नवनवीन लुकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

उर्फी कधी खेळण्यांपासुन स्वतःचे ड्रेस बनवते, कधी झाडापासुन तर कधी मोबाईल पासुन स्वतःसाठी ड्रेस बनवत असते. पण आता मात्र उर्फीने केलेल्या नवीन लुकमुळे तिला थेट जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

(Urfi Javed Gets Death Threats For Recreating Rajpal Yadav's Bhool Bhulaiyaa Look)

उर्फीने राजपाल यादवचा लुक केला रिक्रिएट

भुलभुलैया मधला राजपाल यादवचा लुक तुम्हाला आठवत असेलच. भुलभुलैया मध्ये राजपालने साकारलेल्या छोटा पंडित सर्वांना खळखळुन हसवतो. संपुर्ण अंग कुंकवाने माखलेलं, गळ्यात लाल, कानाच्या वर अगरबत्ती असा राजपालचा अतरंगी लुक सर्वांना आवडला.

हाच लुक उर्फीने रिक्रिएट केलाय. उर्फीने ऑनलाइन शेअर केलेल्या धमकीच्या स्क्रीनशॉटमध्ये अभिनेत्रीच्या नवीन लुकमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. याशिवाय तिला भर चौकात गोळी घालण्याची धमकी मिळालीय.

उर्फाला मिळाली जीवे मारण्याची धमकी

उर्फीने धमकी मिळाल्याचा स्क्रीनशॉट शेअर करुन लिहिले, “मला धक्का बसला आहे. मला एका चित्रपटातील पात्र पुन्हा साकारल्यामुळे जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत."

राजपाल यादवने जेव्हा हे पात्र साकारलेलं तेव्हा त्याला कोणताही विरोध झाला नाही. परंतु मी हे कॅरेक्टर रिक्रिएट केल्याने मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.” असं उर्फीने लिहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT