Urfi Javed Goes Semi Nude and said happy Diwali netizens trolled her sakal
मनोरंजन

Urfi javed: उर्फीनं दिवाळी केली हॅप्पी, कपडे काढून दिल्या शुभेच्छा..

सणासुदीच्या शुभेच्छा इतक्या वाईट पद्धतीने दिल्याने चाहत्यांनी तिला चांगलेच झोडपले आहे.

नीलेश अडसूळ

Urfi Javed latest video: सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू आहे. करोनाच्या दोन वर्षानंतर यंदाची दिवाळी निर्बंधमुक्त असल्याने घराघरात चैतन्य आणि आनंदाच वातावरण आहे. अशीच दिवाळीची धमाल बॉलीवुडमध्येही सुरू आहे. मनीष मल्होत्रा, कृती सनन असेल आशा अनेक कलाकारांच्या घरी दिवशी सेलिब्रेशन सुरू आहे. सर्व कलाकार आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहे. पण चित्र विचित्र कंपड्यांमुळे चर्चेत असणाऱ्या उर्फीनेही आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे. पण तिने दिलेल्या शुभेच्छा चाहत्यांना चांगल्याच खटकल्या आहेत. कारण दिवाळी सारख्या पवित्र सणाला तिने कपडे काढून शुभेच्छा दिल्या आहेत.

(Urfi Javed Goes Semi Nude and said happy Diwali netizens trolled her)

फॅशन जगतात रोज तिच्या कपड्यांवर प्रयोग करणारी उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. उर्फी तिच्या फॅशन सेन्स आणि स्टाइलसाठी ओळखली जाते. ती तिच्या लूकने सोशल मीडियावर दहशत निर्माण करते. प्रत्येक वेळी तिची नवीन स्टाईल लोकाना वेड लावते. काही दिवसांपूर्वीच उर्फीने बॅकलेस शर्ट घालत नेटकऱ्यांचा पारा चढवला होता. आता तर तिने कहरच केला आहे. चक्क कपडे काढून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिचा हा व्हिडिओ सध्या बराच व्हायरल होत आहे.

उर्फीने शेयर केलेल्या व्हिडिओ मध्ये समोर काही दिवे लावले आहेत. आणि तिच्या समोरच्या ताटात एक मोठा लाडू ठेवला आहे. या व्हिडओमध्ये ती टॉपलेस झाली आहे. तिने एक घागरा परिधान केला असला तरी त्यावर तिने काहीही परिधान केलेले नाही. तिने आपले अंग केवळ हाताच्या आधाराने झाकले आहे. ही करताना तीने एका हाताने लाडू खाल्ला आहे. या व्हिडिओला तिने सर्वांना हॅप्पी दिवाळी अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

पण या शुभेच्छा तिला चांगल्याच महागात पडल्या आहेत. लोकांना तिचे वागणे खूप खटकले आहे. दिवाळीच्या पवित्र सणाला तिने कपडे काढून शुभेच्छा दिल्याने नेटकऱ्यांनी तिच्यावर सडकून टीका केली आहे. उर्फी तुला ही व्हिडिओ करताना शरम वाटली नाही का, दिवाळी सारख्या पवित्र सणाला तू अशा शुभेच्छा कशा देऊ शकतेस, तुला लाज आहे का, पवित्र हिंदू सणाचे पवित्र बिघडवू नकोस अशा अनेक कमेंट तिच्या व्हिडिओवर आल्या आहेत. हा व्हिडिओ सध्या बराच चर्चेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT