Urfi Javed make her new dress with hair comb video esakal
मनोरंजन

Urfi Javed Video Viral : 'आमच्या घरातील कंगवे गेले कुठे?' उर्फीच्या त्या व्हिडिओनं नेटकरी हँग!

आता उर्फीच्या हटके फॅशनचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात तिनं जी वेशभूषा केली आहे त्यावरुन तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

युगंधर ताजणे

Urfi Javed make her new dress with hair comb video : उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या अतरंगी फॅशनमुळे चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. त्यावरुन उर्फीला अनेकांनी साम, दाम, दंड आणि भेद याप्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा तिच्यावर काहीही परिणाम झालेला नाही.

आता उर्फीच्या हटके फॅशनचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात तिनं जी वेशभूषा केली आहे त्यावरुन तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी उर्फीवर नेहमीप्रमाणे जोरदार टीका केली आहे. काहींनी तर उर्फीच्या हटके स्टाईलवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एवढी भारी आयडिया उर्फीला सुचते तरी कशी, असा प्रश्न तिला नेटकऱ्यांनी विचारला आहे.

Also Read - दिल्लीतल्या केवळ प्रशासकीय बदल्यांपुरतंच मर्यादित नाही, दिल्ली सेवा विधेयक. काय आहेत

यापूर्वी उर्फीनं वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करुन तिची फॅशनची हौस पूर्ण केली आहे. घरातील ग्लास, भांडी, मोबाईल फोन आणि चक्क कंगव्याचा ड्रेस उर्फीनं परिधान करुन आपण किती क्रिएटिव्ह आहोत याचा परिचय करुन दिला आहे. तिचा तो अंदाज सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

उर्फीनं तो व्हिडिओ शेयर केल्यानंतर त्यावर आलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहेत. एकानं लिहिलं आहे की, मी घरातील माझा कंगवा शोधत होतो. जेव्हा उर्फीचा व्हिडिओ पाहिला तेव्हा मात्र मला धक्काच बसला. उर्फी माझा कंगवा घेऊन गेली. आता काय बोलावं. दुसऱ्या युझर्सनं म्हटले की, उर्फी घरात तर पूर्ण कपड्यात असते. घराबाहेर पडल्यावर ती अशी का वागते हे कळत नाही.

तिसऱ्या युझर्सनं लिहिलं आहे, बस किंवा ट्रेनमध्ये काहीजण कंगवा विकण्यासाठी येतात हे आम्हाला माहिती होतं. पण आता उर्फी देखील हा नवा बिझनेस करु लागली आहे की काय, असा प्रश्न तिचा तो व्हिडिओ पाहिल्यावर पडतो. एवढी कल्पनाशक्ती येते कुठून, असे प्रश्न तिला नेटकऱ्यांनी विचारले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazon Great Freedom Sale 2026: आजपासून मेगा सेल! Galaxy S25 Ultra 40 हजारांनी स्वस्त, पाहा कोणत्या वस्तूंवर मिळतोय मोठा डिस्काउंट

Koyna Dam Tailrace Water Issue : समुद्रात जाणारे कोयनेचे पाणी कोकणाला मिळणार का? पुन्हा नवे सर्वेक्षण सुरू; 'हा' निर्णय ठरवणार भविष्य

Mumbai News: 'स्वातंत्र्यदिनापूर्वी मोठी घटना घडणार, मुंबईत बॉम्बस्फोट करणार...', महापौर रितू तावडेंना धमकीचा मेल

Marathi News Live Updates : पुण्यात उंड्री मुख्य मार्गावर सांडपाणी वाहिनीच्या चेंबरचे झाकण तुटल्याने अपघाताचे सत्र सुरुच

Dr Bhushan Patwardhan: प्रज्ञानातून मानवकल्याणाचा भाव जागृत होईल: डॉ. भूषण पटवर्धन, ‘सकाळ प्रकाशन’तर्फे तीन पुस्तकांचे प्रकाशन

SCROLL FOR NEXT