Urfi Javed looks embarrassed while getting papped in green sweatshirt, netizens troll her sakal
मनोरंजन

Urfi Javed: बाई म्हणायची की हडळ.. तोंड लपवत पळाली उर्फी..

बिना मेकअप रस्त्यावर धावताना उर्फी जावेदचा एक व्हिडओ प्रचंड व्हायरल होत आहे.

नीलेश अडसूळ

urfi javed: आपल्या चित्रविचित्र फॅशन सेन्समुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री उर्फी जावेद सध्या चांगलीच अडचणीत सापडली आहे. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्याने हे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. मुंबईच्या रस्त्यांवर न्युडिटी पसरवण्याचा आरोप त्यांनी उर्फीवर केला आहे. या तक्रारीनंतर उर्फीही चांगलीच भडकली आहे. उर्फी देखील सोशल मीडियावर अनेक पोस्ट करत चित्रा वाघ यांना सुनावत आहे. अशातच एक उर्फीचा विचित्र लुक समोर आला, ज्याची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे.
(Urfi Javed looks embarrassed while getting papped in green sweatshirt, netizens troll her)

उर्फी मंगळवारी रात्री उशिरा एका पार्टीसाठी गेली होती. यावेळी उर्फी चक्क कपड्यांमध्ये आणि मेकप न करता दिसली. यावेळी तिने निळसर हिरव्या रंगाचा ढगळा स्वेट टीशर्ट आणि शॉर्ट्स घातले होते. शिवाय तिचे विखुरलेले केस, सुजलेले तोंड असा विचित्रच लुक दिसला. विशेष म्हणजे या अवस्थेत तिला पापाराझींनी घेरले. पण यावेळी तिने तोंड लपवत तिथून पळ काढला. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

तिच्या या लुकला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. 'पोलिसात तक्रार झाली म्हणून हिचा अवतार बदलला' असे एकाने म्हंटले आहे. तर एकाने 'हिला कपड्यांमध्ये पाहून कॅमेरामन चक्कर येऊन पडला' असे म्हंटले आहे. तर काहींनी ही विना मेकप भुतासारखी दिसते असेही म्हंटले आहे. तिचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT