Urfi Javed viral video  esakal
मनोरंजन

Urfi Javed : रस्त्यावर फिरतांना 'फॅशन' अन् चाकणकरांना भेटायला जाताना 'फॉर्मल' असं कसं चालेल उर्फी!

उर्फी बस्स नाम ही काफी है...असं काहीसं तिच्या बाबत म्हणावे लागेल.

सकाळ डिजिटल टीम

Urfi Javed Meet State Women and Child commision : उर्फी बस्स नाम ही काफी है...असं काहीसं तिच्या बाबत म्हणावे लागेल. गेल्या काही दिवसांपासून उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद संपण्याचे नाव घ्यायला तयार नाही. त्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असून त्यावरील उत्तरं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

सोशल मीडियावर उर्फीनं आतापर्यत चित्रा वाघ यांच्या आरोपांना सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. त्याची जोरदार चर्चाही आहे. त्यामुळे वाघ यांनी काहीही झालं तरी उर्फीनं यापुढे सामाजिक ठिकाणी वावरताना आपल्या पेहरावाचे भान ठेवावे याकडे लक्ष वेधले आहे. मी माझ्या मुद्दयावर ठाम असून महाराष्ट्रामध्ये नंगानाच खपवून घेणार नाही. असे त्यांनी म्हटले आहे.

Also Read - सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये वाघ यांनी पुन्हा एकदा उर्फीवर हल्लाबोल केला आहे. आपली भूमिका कुण्या एका व्यक्तीविरोधात नसून समाजामध्ये कपड्यांवरुन ज्याप्रकारे गोष्टी होतात त्याबाबत आहे. त्यात उर्फीनं भान ठेवत वागण्याची गरज आहे. तिच्याविरोधात महिला आयोगानं दखल घ्यावी असे पत्र त्यांना पाठवण्यात आले आहे.

दुसरीकडे आयोगानं उर्फीला बोलावून घेतले होते. उर्फी आयोगाच्या कार्यालयात दाखल झाली होती. यावेळी तिनं रुपाली चाकणकर यांची भेटही घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून तिच्या कपड्यांवरुन तिला वेगवेगळ्या कमेंटसही मिळाल्या आहेत. त्यात तिचे टी शर्ट, गॉगल यावरुन ती ट्रोल होताना दिसते आहे.उर्फीनं यावेळी वाघ यांच्याविरोधात आयोगाकडे तक्रार दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

एरवी अजीबोरगरीब फॅशन करणारी उर्फी एवढ्या साध्या कपड्यात आली कशी असा प्रश्न नेटकरी विचारु लागले आहेत. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. उर्फीन अजुन महिला आयोगाकडे लेखी तक्रार दिली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT