Urfi Javed Esakal
मनोरंजन

Urfi Javed Video: 'अगं येडी उर्फी किवी खाऊन व्हिटॅमिन मिळतं...आली अंगावर लावून..'

उर्फी जावेद आपल्या अतरंगी फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते आणि ट्रोल होते.

प्रणाली मोरे

Urfi Javed: अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेदचा ड्रेसिंग सेन्स पाहिल्यावर भल्याभल्यांचं डोकं चालायचं बंद होतं. कारण तिच्या ड्रेसच्या डिझाईन्स या अनेकदा कल्पनेपलिकडच्या असतात. उर्फीनं पुन्हा एकदा आपला नवीन ड्रेस घालून लोकांना शॉक दिला आहे.

उर्फी जावेदनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिनं फळांनी बनवलेला ड्रेस घातलेला दिसत आहे. बरं तेच अंगावरची फळं तोडून खाताना दिसतेय. उर्फी जावेदचा हा अंदाज पाहून चाहते तिच्या ड्रेसिंग स्टाईलची आणि त्यामागच्या आयडियाची प्रशंसा करताना दिसत आहेत.

तर अनेकांनी तिच्या या नवीन ड्रेसवरुन तिला ट्रोल केलं आहे.(Urfi javed New Dress Viral Video)

उर्फी जावेदनं मंगळवारी २१ मार्च,२०२३ रोजी आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की उर्फी जावेदनं कीवी फळाच्या गोल चकत्या कापून त्यांना धाग्यात ओवून त्याचा टॉप बनवला आहे आणि चक्क तो परिधान केला आहे.

त्यावर तिनं ब्लॅक कलरची सैलसर पॅंट घातली आहे. बरं हा किवीचा टॉप बनवलाय ते ठीक आहे पण त्यातल्या कीवी एकेक करून खातेय ते पाहून डोक्याला हात लावायची वेळ न आली तर नवल.

आता हे सगळे उर्फीचे प्रताप पाहून तिचे काही चाहते खूश झालेयत तर अनेकांनी तिच्या या ड्रेसमुळे पुन्हा तिच्यावर निशाणा साधला आहे.

उर्फी जावेदनं व्हिडीओसोबत कॅप्शन लिहिलं आहे,'कशापासून टॉप बनवलाय बरं..सांगाल का?'

उर्फी जावेदचा हा व्हिडीओ पाहून एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'मी गहू विकून रिचार्ज केलं होतं ,मला नव्हतं माहित हे सगळं पाहायची वेळ येईल'.

तर आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,' एक नंबरची वेडी मुलगी'. तर आणखी एकानं लिहिलं आहे की,'उर्फी जावेद तू मुर्ख आहेस,खायच्या गोष्टीला अंगावर घातलंयस'.

तर आणखी एकानं लिहिलं आहे की,'कधीतरी चांगल्या गोष्टी कर'.

अशाप्रकारे सोशल मीडियावर उर्फी जावेदला जोरदार ट्रोल केलं गेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्मशानभूमीतील कपड्यांचा थाटला नवा घाणेरडा व्यवसाय, अहमदाबादला पोहोचत होते ‘ब्रँड न्यू’ बनून

IPL 2026: लखनौचा संघ चेन्नईलाही धक्का देणार?; ऋतुराज गायकवाडच्या संघासाठी प्लेऑफकरिता विजय आवश्यक, पहा कशी असेल Playing 11

Arzan Khambatta Sculptures : अरझान खंबाट्टा: शाळेत ड्रॉईंगमध्ये नापास होणारा मुलगा 'असा' बनला देशाचा प्रसिद्ध शिल्पकार

असं काय घडलेलं की, दिग्दर्शकांच्या पत्नीनं थेट उर्मिलाला मारलेली कानशिलात? अभिनेत्रीच्या एका चुकीमुळे बॉलिवूडने फिरवली पाठ?

Gold Price Drop in May : मे महिन्यात सोने स्वस्त, लग्नसराईत दिलासा!; ५ महिन्यात सोन्यात तब्बल ४० हजारांची घसरण

SCROLL FOR NEXT