Urfi Javed Ram Puja Esakal
मनोरंजन

Urfi Javed Ram Puja: 'मैं तो भोग लगाऊंगी..', कहर करणारी उर्फी बसली प्रभू श्रीरामाच्या पूजेला

'Main to Bhog Lagaungi..', Urfi sat down to worship Lord Sri Rama: देशभरात अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह दिसून येत आहे. अनेकांना या सोहळ्याचं आमत्रंण देण्यात आलं आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

देशभरात अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह दिसून येत आहे. अनेकांना या सोहळ्याचं आमत्रंण देण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी अनेक जण उपस्थित असणार आहेत.

तर काही बडे नेते, अभिनेते हे घरी किंवा एखाद्या मंदिरात पूजा करताना दिसत आहेत. अशातच आपल्या अतरंगी फॅशनमुळे वारंवार चर्चेत असलेली उर्फी जावेद देखील आज श्री रामाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचे दिसून येत आहे.

उर्फी जावेदने पूजा केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. तसेच उर्फीचा आजचा साधा ड्रेसमधील लूक देखील चर्चेत आला आहे. तिने हा व्हिडीओ सोशल मिडीया अकाऊंट वरून शेअर केला आहे. तर त्या व्हिडीओला तिने 'राम आयेंगे तो..' हे गाणं लावलं आहे.

तिने घरी होम पेटवला आहे. यावेळी पूजा सुरू असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या आधी उर्फी जावेदने तिच्या घरात हवन केले त्याचा व्हिडिओ तिने शेअर केला.

बोल्ड फॅशन निवडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या जावेदने पारंपारिक भारतीय पोशाख परिधान करून अग्नीला तूप अर्पण करून विधी केला. त्याचबरोबर 'आजचा दिवस साजरा करणाऱ्या प्रत्येकाचे तिने अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation Protest : मनोज जरांगेंना एकच दिवस परवानगी मिळालीय, सरकार काय करणार? एकनाथ शिंदे म्हणाले, ''आम्ही....''

PCMC News : काळेवाडी भुयारी मार्गातील अस्वच्छता आणि असुरक्षा; महिलांची सुरक्षा धोक्यात

Manoj Jarange News: भीम आर्मीचा मराठा आरक्षण आंदोलनाला जाहीर पाठिंबा

Himachal Flood: जोर ओसरूनही जनजीवन विस्कळित; हिमाचलमध्ये रावी नदीला अचानक पूर, वाराणसीत गंगाआरतीला अडथळा

Gauri festival : गणेशोत्सवानंतर आता गौराईंची तयारी; कापडी फुलांसह ज्वेलरी सेट खरेदीसाठी बाजारात गर्दी

SCROLL FOR NEXT