urfi javed  Sakal
मनोरंजन

Urfi Javed: वयाच्या 15 व्या वर्षी उर्फी जावेदच्या फोटोंचा झाला गैरवापर, कुटुंबीयांनीही म्हटलं 'पॉर्न स्टार'

उर्फीने नुकताच एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे.

Aishwarya Musale

उर्फी जावेद हे आजच्या युगातील एक असे नाव आहे ज्याबद्दल क्वचितच कोणाला माहिती नसेल. ती नेहमीच तिच्या अतरंगी आउटफिटमुळे आणि विचित्र फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. पण, या हसऱ्या चेहऱ्यामागे एक वेदना दडलेली आहे, हे तुम्हाला माहीत आहे का. होय, वयाच्या १५ व्या वर्षी उर्फीसोबत असे काही घडले जे कोणीही सहन करू शकत नाही.

अनेक मुलाखतींमध्ये उर्फीने तिच्यासोबत घडलेल्या या घटनेचा खुलासा केला आहे. उर्फीचे बालपण खूप वेदनादायी गेले. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान उर्फीने सांगितले की, तिच्या लहानपणी तिच्यासोबत असे काही घडले होते, ज्यामुळे तिने वयाच्या १७ व्या वर्षी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. हे पाऊल का उचलले हेही सांगितले.

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना उर्फी जावेदने सांगितले की, वयाच्या १५ व्या वर्षी तिचे फोटो पोर्न साइटवर अपलोड केल्याने तिचे बालपण अडचणीत आले. मात्र, ते फोटो नॉर्मल होते. तिने ट्यूब टॉप घातलेले तिचे फोटो फेसबुकवर शेअर केले होते. कोणीतरी ते फोटो मॉर्फ न करता डाउनलोड केले आणि पॉर्न साइटवर अपलोड केले. हळूहळू सगळ्यांना त्या फोटोंची माहिती झाली. त्यानंतर तिच्यावर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.

उर्फीने पुढे सांगितले की, तिला सांगण्यात आले की ती एक पॉर्न स्टार आहे. तेव्हा उर्फीची प्रतिक्रिया होती कुठे आहे व्हिडीओ? पण तरीही लोक तिला पॉर्न स्टार म्हणू लागले. तिच्या वडिलांनीही तिला पॉर्न स्टार म्हटले.

उर्फीने सांगितले की, तिला असे वाटते की तिच्या वडिलांना या सर्व लोकांची सहानुभूती मिळवायची होती. पॉर्न साइट मालक 50 लाखांची मागणी करत असल्याचे वडील सर्व नातेवाईकांना सांगत होते. ते लोक उर्फीला मारहाण करत होते. त्यानंतरच तिने घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला.

उर्फीने पुढे सांगितले की, ती तिच्या 6 बहिणींसोबत घरातून निघून गेली. लखनऊमध्ये एक जागा शोधून ती राहू लागली आणि मुलांना शिकवून भाडे देऊ लागली. नंतर ती दिल्लीला शिफ्ट झाली, जिथे तिने कॉल सेंटरची नोकरी जॉईन केली. यानंतर उर्फी मुंबईत आली आणि पीजीमध्ये राहू लागली. ती अनेक भूमिकांसाठी ऑडिशन देत राहिली, त्यानंतर तिला एका टीव्ही शोमध्ये छोटीशी नोकरी मिळाली. आता उर्फीचे डिझाईन्स परदेशात फॉलो केले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT