Bigg Boss OTT 2 Esakal
मनोरंजन

Bigg Boss OTT 2: ना एल्विश ना अभिषेक ! उर्फीनं सांगितलं बिग बॉसच्या सिझनचा विनर, जियावर तर भडकलीच..

बिग बॉस ओटीटी 2 बिग बॉस ओटीटी 2 चा सीझन आता अंतिम टप्प्यात आहे. आत्तापर्यंत फक्त अभिषेक मल्हान फिनालेमध्ये गेला आहे. तर आता उर्फीनं थेट विजेत्या स्पर्धकाच्या नावाची घोषणा केली आहे.

Vaishali Patil

बिग बॉस ओटीटी 2 चा दुसरा सिझन बराच गाजला. कधी स्पर्धकांमधील वाद तर कधी घरात आलेले वाईल्ड कार्ड स्पर्धक यांनी घरात खुपच राडा घातला. एल्विश यादवच्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीनंतर हा शो आणखीनच रोमांचक झाला. त्याच्या चाहत्यांनी तर त्याला आत्ताच विनर घोषित केलं आहे.

त्यात आता या विकेंड का वार मध्ये पुन्हा कोण घराबाहेर जाणार याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र शो मध्ये जिया शंकरला पुन्हा ट्रोल करण्यात येत आहे तर पुजा भट्टला तिच्या वागण्यामुळे काहींनी ट्रोल केलं तर काहींनी सपोर्ट केला आहे. अभिषेकनं फायनलचं टिकीट मिळवलं आहे.

आता या शोमध्ये सुरु असलेल्या महभारतावर सोशल मिडियावर चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदने कमेंट केली आहे.

उर्फी ही बिग बॉस पाहत असते. ती वेळोवेळी पोस्ट शेयर करत त्या शोमध्ये होत असलेल्या घडामोडींवर प्रतिक्रिया देत असते. आता तिचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे ज्यात तिनं घरातील टॉप तीन स्पर्धकांची नाव प्रेक्षकांना सांगितले आहे. यासोबत तिला घरात कोणता स्पर्धक तिला खुप खटकतो त्याचं नाव देखील तिनं सांगितलं आहे.

याबाबत तिने खुलासा करत सांगतिलं की, जिया शंकरला बिग बॉसने लवकरात लवकर घराबाहेर हाकलावं असं तिनं सांगितलं. तिला जिया मुळिच आवडत नाही. तिनं जिया शंकर ही बिग बॉसच्या घरातलं व्हिलन म्हटलं आहे.

त्याचबरोबर पुढे उर्फी जावेदने बिग बॉसची स्पर्धक मनीषा राणी हिला विजेती म्हणून निवडलं आहे. मनिषाबद्दल बोलतांना उर्फी जावेद म्हणाली की, तिला मनिषा खूप आवडते, ती खुप खरी आहे. ती जशी आहे तशीच ती घरा दाखवतचे.

त्यानंतर तिने टॉप फायनलसाठी अभिषेकची निवड केली. त्याला निवडण्याचं कारण सागंतांना ती म्हणते की तो खुप छान बोलतो, पूजा भट्टसारख्या स्पर्धकालाही त्यानं चांगलचं सुनावलं. तर तिसऱ्या क्रमांकांवर तिला बेबिका हवी आहे. कारण बेबिकाचा बेधडकपणा तिला आवडल्यांचं तिनं सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cheteshwar Pujara: 'क्रिकेटसाठी तू बरीच तडजोड केलीस, आता...' पुजारासाठी पत्नी पूजाची भावनिक पोस्ट

'वडापाव'मध्ये दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी; ठरणार प्रसाद ओकचा १०० वा चित्रपट

Video: असं कुठं होतं का राव! US Open स्पर्धेत टेनिसपटूचा राडा, फोटोग्राफरचा व्यत्यय अन् भिडला अम्पायरला; प्रेक्षकांनी दिली साथ

Hartalika Vrat 2025 Marathi Wishes: शिव व्हावे प्रसन्न...! हरतालिकेच्या प्रियजनांना पाठवा मराठीतून खास शुभेच्छा, वाचा हटके संदेश

Nashik Crime : एकतर्फी प्रेमाचा भयानक शेवट; सिडकोतील अल्पवयीन विद्यार्थिनीने संपवलं जीवन, दोघे संशयित अटकेत

SCROLL FOR NEXT