Urfi Javed and Javed Akhtar Sakal
मनोरंजन

Urfi Javed: 'अखेर मी आजोबांना भेटले...', जावेद अख्तरांना भेटून उर्फी म्हणाली

उर्फीचा एका फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पण या फोटोमुळे उर्फी वादाच्या भोवऱ्यात अडकली नसून चर्चेत आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

उर्फी जावेद सोशल मीडियावर सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिच्या बोल्ड फोटोंमुळे ती नेहमीच अडचणीत सापडलेली दिसते. तिचे वेगवेगळ्या आउटफिटमधले फोटो रोज व्हायरल होतात. तिचा आउटफिट इतका अनोखा असतो की तिला पाहून लोकं आश्यर्यचकित होतात. पण उर्फीला प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी नवीन आउटफिट हवाच असे नाही. तिचे विधानेही कधी कधी व्हायरल होतात. आता अभिनेत्रीने एक नवीन फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती जावेद अख्तर यांच्यासोबत दिसत आहे.

उर्फीने हा फोटो इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे. यामध्ये ती निळ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये दिसत आहे. दुसरीकडे जावेद अख्तर नेहमीप्रमाणे पायजमा कुर्त्यात असून त्यांनी शालही घेतली आहे. विमानतळावरून शेअर केलेल्या या फोटोत दोघेही हसताना दिसत आहेत. त्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

फोटोसोबत एक मजेदार इमोजी शेअर करत उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले – ‘अखेर माझ्या आजोबांना भेटली…’ उर्फीची पोस्ट सध्या तुफान चर्चेत होत आहे. तसेच उर्फीच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. सध्या उर्फीची पोस्ट तुफान चर्चेत होत आहे. उर्फीच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. उर्फी जावेद आणि जावेद अख्तर यांच्या फोटोची सध्या सर्वत्र चर्चा रंगलेली आहे.

उर्फी जावेद सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. उर्फीच्या विचित्र आउटफिटमुळे सध्या सर्वत्र वादग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या टीकेनंतर उर्फी जावेदच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. चित्रा वाघ यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करत उर्फीवर निशाणा साधला होता. तसेच त्यानंतर उर्फीने देखील त्यांच्या ट्विटला सडेतोड उत्तर दिले.

खरंतर अभिनेत्रीला करण जोहरच्या बिग बॉस ओटीटी शोमधून लोकप्रियता मिळाली. तेव्हापासून ती प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांची नात असल्याची बातमी लोकांमध्ये पसरली. याबाबत तिने आधीच स्पष्टीकरण दिले असले तरी अलीकडेच असा योगायोग घडला की उर्फी आणि जावेद विमानतळावर भेटले. उर्फीने या संधीचा फायदा घेत लेटेस्ट फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. बिग बॉस ओटीटीमधून बाहेर काढलेली ती पहिली स्पर्धक होती. बिग बॉस OTT नंतर, तिची लोकप्रियता सोशल मीडियावर गगनाला भिडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT