Urfi Javed slams Hindustani Bhau after he comments on her fashion sense  sakal
मनोरंजन

Urfi Javed: हिंदुस्तानी भाऊपुढेही नमली नाही उर्फी जावेद! त्यालाही आणलं होतं जेरीस..

हिंदुस्तानी भाऊनेही केली होती उर्फीवर टीका, पण उर्फीने दिलं होतं सडेतोड उत्तर..

नीलेश अडसूळ

urfi javed: आपल्या चित्रविचित्र फॅशन सेन्समुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री उर्फी जावेद नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच नवीन अडचणीत सापडली आहे. कारण उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. मुंबईच्या रस्त्यांवर न्युडिटी पसरवण्याचा आरोप त्यांनी उर्फीवर केला. या तक्रारीनंतर उर्फी चांगलीच भडकली आहे. उर्फीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चित्रा वाघ यांना आव्हानच दिलं आहे. सध्या दोघींमध्ये चांगलाच वाद सुरू आहे. पण उर्फी या आधी अनेकांना नडली आहे, त्यापैकीच एक नाव म्हणजे हिंदुस्तानी भाऊ..

(Urfi Javed slams Hindustani Bhau after he comments on her fashion sense)

फॅशन जगतात रोज तिच्या कपड्यांवर प्रयोग करणारी उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. ती प्रत्येक वेळी तिची नवीन स्टाईल लोकाना वेड लावते. अत्यंत तोकड्या कपड्यात ती कायम समोर येत असते. त्यामुळे अनेकदा ती ट्रोल देखील झाली आहे. पण 'आता तू स्वतःला आवर घाल.. नाहीतर मी आवरेन..' अशी धमकी हिंदुस्तानी भाऊने तिला एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली होती. पान ऐकेल ती उर्फी कसली. तिनेही भाऊला चांगलेच सुनावले होते.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

हिंदुस्तानी भाऊ हा सोशल मिडियावर शिवराळ भाषेत सतत पाकिस्तानला शिव्या देत असतो. याशिवाय अनेक थिल्लर कलाकार त्याच्या रडारवर असतात. मध्यंतरी हिंदुस्तानी भाऊ बिग बॉसमध्येही झळकला होता, त्यामुळे त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. सतत वेगवेगळे विषय घेऊन व्हिडिओ करणाऱ्या हिंदुस्तानी भाऊने मध्यंतरी थेट उर्फी कडे आपला मोर्चा वळवला होता.

हिंदुस्थानी भाऊने एक व्हिडिओ करून उर्फीला सुधारण्याची धमकी दिली होती, त्या व्हिडिओमध्ये तो म्हणाला आहे, 'जय हिंद, आज स्वत:ला एक मोठी फॅशन आयकॉन मानणाऱ्या उर्फी जावेदसाठी हा संदेश आहे... ही भारताची प्रथा नाही, ही आपली संस्कृती नाही. तुझ्यामुळे बहिणी-मुलींना खूप चुकीचा संदेश जात आहे. बेटी तू स्वतःला सुधार नाहीतर मी तुला सुधारेन.'

यावेळी हिंदुस्थानी भाऊचा व्हिडीओ पाहून उर्फी जावेद चांगलीच चवताळली होती. तिने एक पोस्ट करत त्याला त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. 'मला फक्त सुधारणेच नाही तर बिघडवणे देखील माहित आहे. तू मला उघडपणे धमक्या दिल्यास तर मी तुला तुरुंगात पाठवू शकते हे तुला माहीत आहे का? तुला आठवतंय का काही महिन्यांपूर्वी तू माझ्या फोटोग्राफरला आणि मोहसिनला सांगितलं होतंस की तुला माझ्याशी बोलायचं आहे आणि ओबेद आफ्रिदी प्रकरणात मला मदत करायची आहे. त्यामुळे तू एक लक्षात ठेव तुला फक्त प्रसिद्धी हवी आहे आणि मी तुला साफ नकार दिला होता.' अशी भांडाफोड तिने केली होती.



याशिवाय उर्फीने आणखी एक पोस्ट शेअर केली होती. त्यात ती म्हणाली होती, ''मला इंटरनेटवर जीवे मारण्याच्या धमक्या मिळतात, याचा मला मानसिक त्रास होतो पण मी अशा लोकांना घाबरत नाही, पण मला माझ्या सुरक्षिततेची काळजी आहे. माझ्यापेक्षा ही लोक ज्या पद्धतीच्या व्हिडिओ करतात त्यापासून जास्त धोका आहे. मी काय घालते याची त्यांना अजिबात पर्वा नाही, त्यांना फक्त प्रसिद्धी हवी आहे.'' असे म्हणत उर्फीने भाऊच्या शिवराळ भाषेतील व्हिडिओवर निशाणा साधला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! शैक्षणिक सहलींसाठी विद्यार्थ्यांसाठी सहलीत ५० टक्के सवलत; प्रत्येकास १० लाखांचा अपघात विमाही; एसटी महामंडळाचे आगारप्रमुख जाणार शाळांमध्ये

आजचे राशिभविष्य - 19 नोव्हेंबर 2025

Horoscope Prediction : आज तयार होतोय अमला राजयोग; मेष आणि या पाच राशींच्या आर्थिक अडचणींना लागणार पूर्णविराम !

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात रवा पिझ्झा बॉल ट्राय केले का? लगेच लिहून घ्या रेसिपी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 नोव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT