Urfi Javed Home issue  esakal
मनोरंजन

Urfi Javed Tweet: 'नंगे तो सभी है, मैं तो...' उर्फी पुन्हा बोलून गेली!

उर्फीच्या एका मित्रानं तिच्याविषयी धक्कादायक खुलासा करुन मोठी खळबळ उडवून दिली होती.

सकाळ डिजिटल टीम

Urfi Javed tv entertainment actress share boldness : उर्फीविषयी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी उर्फी काहीही करु शकते हे तिच्याकडे पाहिल्यावर दिसून आले आहे. उर्फी आणि तिचे कपडे हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. यावरुन तिला कित्येकदा नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. आता तर उर्फीनं तिला डिवचणाऱ्यांवर जी प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे ती पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

उर्फीच्या एका मित्रानं तिच्याविषयी धक्कादायक खुलासा करुन मोठी खळबळ उडवून दिली होती. फैझान अन्सारीनं उर्फी ही तृतीयपंथीय असल्याचे सांगत आपल्याकडे त्याबाबत पुरावे असल्याची माहिती दिली होती. त्यावर अद्याप उर्फीची कोणती प्रतिक्रिया आलेली नाही.मात्र तिच्या एका ट्विटनं पुन्हा एकदा नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपण आपल्या बोल्डनेसचे जे काही प्रदर्शन करतो आहे त्याच्याविषयी लोकांची मतं आहे ते कशी चुकीची आहेत यावर उर्फीनं सांगितलं आहे.

Also Read - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

उर्फीनं तिच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, नग्न तर सारेच असतात. मी फक्त तुम्हाला ती कपड्यांच्या माध्यमातून सांगते तर काही जण त्यांच्या विचारानं तुम्हाला त्यांच्यातील नग्नता समजावून सांगत असतात. त्यामुळे बऱ्याचदा मला माझ्या राहणीमानावरुन जे काही बोलत असतात याचे मला काहीही वाटत नाही. लोकं काही समजावून घ्यायला तयार नाहीत.

उर्फीच्या त्या ट्विटवर तिला नेटकऱ्यांनी कमेंटसही केल्या आहेत. त्यात एकानं म्हटलं आहे की, तुम्ही जे म्हणत आहात ते बरोबर आहेत. कारण तुमचे जसे कपडे आहेत तशीच तुमची विचार करण्याची पद्धतही तशीच होत चालली आहे. अशा शब्दांत उर्फीनं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT