Urfi Javed Tweet esakal
मनोरंजन

Urfi Javed Tweet : उर्फीचा पुन्हा कहर, अर्धनग्न फोटोला दिली जळजळीत कॅप्शन!

टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी उर्फी ही नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे ट्रोल होत असते.

सकाळ डिजिटल टीम

Urfi Javed Tv entertainment Actress controversy : टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी उर्फी ही नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे ट्रोल होत असते. गेल्या काही दिवसांपासून उर्फीच्या फॅशनवर भाजपच्या चित्रा वाघ यांनी प्रचंड टीका केली आहे. आणि काही झालं तरी पोलिसांनी उर्फीवर कारवाई करावी अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.

यासगळ्यात उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यात चांगलीच तू तू मैं मैं पाहायला मिळाली आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीची तिच्या कपड्यांवरुन चांगलीच कानउघाडणी केल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे कृत्य खपवून घेतले जाणार नाही. उर्फीनं वेळीच तिच्या कपड्यांबाबत भान ठेवून वागावे.अन्यथा योग्य ती कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. असेही वाघ म्हणाल्या होत्या.

Also Read - ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

ऐकेल ती उर्फी कसली तिनं देखील वाघ यांना तुमच्याकडील सगळे प्रश्न संपले आहेत की काय तेव्हा माझ्यावर टीका करत आहात. असे म्हणत तुम्ही तुमचे प्रश्न पाहा माझ्याकडे लक्ष देऊ नका. असे म्हटले होते. आज तर उर्फीनं जो फोटो शेयर केला आहे त्याला दिलेल्या कॅप्शनमुळे पुन्हा एक नवा वाद तयार झाला आहे. किस माय...असे म्हणत तिनं अर्धनग्न फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

उर्फीच्या त्या व्टिटला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्यावर तिनं कुणावर ही टिप्पणी केली आहे, असा प्रश्न त्यांनी तिलाच विचारला आहे. उर्फी ही नेहमीच तिच्या तऱ्हेवाईक कपड्यांमुळे आणि अतरंगी फॅशनमुळे चर्चेत राहणारी सेलिब्रेटी आहे. त्यामुळेच की काय तिच्यावर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणावर टीका होत असते.

उर्फीला अंग झाकण्यासाठी घरातील कोणतीही वस्तू बस होते अशा प्रतिक्रिया तिला नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. तिनं देखील शंख शिंपले, कागद, प्लॅस्टिक पिशव्या, घरातील ज्युसचे ग्लास, पडदे, ब्लेड्स याचा आधार घेत केलेले फोटोशुट चर्चेचा विषय ठरले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wholesale Inflation India : घाऊक महागाईचा दर वाढला! 4 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आकडेवारी, सामान्य जनतेला फटका

बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमांचा डंका ! तीन दिवसात तिन्ही सिनेमांनी केलेलं कलेक्शन घ्या जाणून

अ‍ॅडव्हान्स कर भरलात का? आज शेवटची तारीख, न भरल्यास होईल दंड

Sanjay Raut : भारत-पाक सामन्यामुळे पाकिस्तानला मिळाले हजार कोटी रुपये? संजय राऊत म्हणतात दीड लाख कोटींचा जुगार...

Gold Rate Today : आज अचानक उतरले सोन्याचे दर! किती हजारांनी स्वस्त झालं, पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT