Urfi Javed Esakal
मनोरंजन

Urfi Javed: उर्फीनं स्कर्ट सोडला अन् चक्क.. नव्या व्हिडिओनं टेंपरेचर वाढलं

उर्फी जावेदनं नवा अतरंगी व्हिडीओ शेअर केला अन् लोकांनी तिच्यावर जोरदार ट्रोलिंगचा मारा सुरु केला. पण असं असलं तरी तिला इग्नोर मात्र कुणी करत नाही.

प्रणाली मोरे

Urfi Javed: टी.व्ही अभिनेत्री आणि सोशल मीडिया क्वीन उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असलेली पहायला मिळते. उर्फी जावेद नेहमीच आपल्या कारनाम्यांनी लोकांना तोंडात बोटं घालायला लावते.

तिची अतरंगी फॅशन भले लोकांना पसंत येवो न येवो..पण तिला कोणी इग्नोरही करू शकत नाही हे देखील तितकंच खरं आहे. उर्फी जावेद जिथे जाते तिथे लोकांच्या नजरा तिच्याहून अधिक तिच्या कपड्यांवर टिकतात.

प्रत्येकाचा इंट्रेस्ट उर्फी आता नवीन काय घालते हे जाणून घेण्यात असतो. उर्फी आपल्या या अजब ड्रेसिंग स्टाईलनं नेहमीच चर्चेत असलेली पहायला मिळते. (Urfi Javed Video viral people troll her new dress)

उर्फी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेली पहायला मिळते. ती नेहमीच आपल्या अतरंगी फॅशन स्टाईलला सर्वांसमोर बिनधास्त आणताना दिसते. उर्फीच्या लेटेस्ट फोटोंनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.

उर्फी जावेदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत नेटकरीच नाही तर उर्फीच्या आजुबाजूला उभे असलेले लोक ठरवून देखील तिच्यावरनं नजर हटवू शकत नाहीत असं स्पष्ट दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये अभिनेत्री काळ्या रंगाची मोनोकिनी सारख्या दिसणाऱ्या टॉपमध्ये नजरेस पडतेय. तर तिनं स्कर्टच्या जागी प्लास्टिक सारखं काहीतरी गुंडाळलेलं दिसत आहे. उर्फीचा हा आऊटफिट दिसायला एकदम अजब दिसत आहे.

अभिनेत्रीनं आपल्या कानात मोठे कानातले आणि पांढऱ्या रंगाची हाय हिल्स घातली आहे. उर्फी मोठ्या आत्मविश्वासानं या ड्रेसला कॅरी करताना दिसत आहे.

अर्थात उर्फीचा हा अंदाज सोशल मीडियावरील नेटकऱ्यांना काही खास पसंत पडलेला नाही. नेटकऱ्यांनी उर्फीच्या या आऊटफिटला खूप ट्रोल केलं आहे.

एका नेटकऱ्यानं कमेंट करत लिहिलं आहे की,'स्कर्टच्या जागी प्लास्टिक गुंडाळून आली वाटतं'. तर आणखी एकानं लिहिलं आहे की,'बस्स...आता हेच पाहणं बाकी होतं.'

आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'आता काय बाकी ठेवलंय हिनं दाखवायचं...', तर एकजण म्हणालाय,'हिला ट्रोल होऊन प्रसिद्धि मिळवायची आहे..आणि असंच होतंय'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT