Urfi Javed vs Chitra Wagh  easkal
मनोरंजन

Urfi Javed vs Chitra Wagh Memes : सहकुटूंब तुळजापुरच्या दर्शनाला! सासूबाई-सूनबाई जोमात, नेटकरी...

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री, सेलिब्रेटी उर्फी जावेद यांच्यातील वाद थांबण्याचे नाव घ्यायला तयार नाही.

सकाळ डिजिटल टीम

Urfi javed vs BJP Chitra Wagh Memes viral social media comment : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री, सेलिब्रेटी उर्फी जावेद यांच्यातील वाद थांबण्याचे नाव घ्यायला तयार नाही. वाघ बोलल्या की त्यावर उर्फी तितक्याच जोरदारपणे हल्ला करताना दिसते आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही व्यक्तींनी लक्ष वेधून घेतले आहे.

उर्फीनं तर चित्रा वाघ यांना पहिल्यांदा चित्रू असे म्हटले त्यानंतर वेगवेगळे फोटो शेयर करुन आपण काही कुणाचे ऐकायला बांधील नाही असा थेट इशारा दिला होता. दुसरीकडे चित्रा वाघ यांनी आपला लढा हा काही कोणत्या धर्माविरुद्ध नाही, त्या व्यक्तीविरोधात देखील नाही. फक्त समाजात जी काही नग्नता पसरवली जात आहे. त्यासाठी आहे.

Also Read - या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

चार भिंतीच्या आत कुणी काय पेहराव करते याच्याशी आम्हाला देणे घेणे नाही. मात्र ज्यावेळी तुम्ही समाजात नंगटपणा करता तेव्हा तो आक्षेपार्ह आहे. तो करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई व्हावी. असे वाघ यांचे म्हणणे आहे. यासाठी त्यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार देखील केली होती. मात्र त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आलेला नाही.

राज्य महिला आयोगाच्या उत्तरानं वाघ संतापल्या होत्या. उर्फी काय करते, ती कोणत्या प्रकारे समाजात वावरते आहे हे पाहूनही तिच्यावर कारवाई होत नाही याला आपण काय म्हणणार असा प्रश्न वाघ यांनी यावेळी केला होता. यासगळ्यात सोशल मीडियावर आता पुन्हा चित्रा वाघ विरुद्ध उर्फी असा सामना सुरु झाला आहे. नेटकऱ्यांचा उर्फीला पाठींबा मिळत असल्याचे दिसून आले आहे.

यासगळ्यात उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यावर सोशल मीडियावर मीम्सही व्हायरल झाले असून ते नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडत आहेत. आता तर तुळजापुरच्या मंदिरात उर्फी ही चित्रा वाघ यांच्या कुटूंबियासमवेत दर्शन घेत असल्याचे फोटो व्हायरल झाले असून ते चर्चेचा विषय आहेत.

उर्फीन तर चित्रा वाघ यांना माझी सासू असे म्हणूनच हाक मारायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी देखील त्यावरुन मीम्स शेयर केले आहेत. काहींनी उर्फीची तऱ्हेवाईक फोटो आणि चित्रा वाघ यावरुन मीम्स तयार केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्कॉर्पिओला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत, मृतांमध्ये ZP सदस्यासह २ माजी सरपंचाचा समावेश

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगेंची पत्रकार परिषद! 30 मे पासून आमरण उपोषण

Badlapur Crime: बदलापुरात वडिलांच्या मित्रानेच १६ वर्षीय मुलीचा केला विनयभंग, मोबाईल चार्जिंगसाठी घरी आला अन्...

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Kolhapur Student Death Case : बाबा दुप्पट फायदा मिळणार आहेत, पैसे पाठवा..., मुलीचे शेवटचे शब्द, कुटुंबीयांनी नाकारलं विद्यार्थिनीने नको ते केलं

SCROLL FOR NEXT