Urmila Kanetkar kothare Birthday urmila adinath kothare love story
Urmila Kanetkar kothare Birthday urmila adinath kothare love story  sakal
मनोरंजन

Urmila Kanetkar Birthday: झोपेतून उठला आणि प्रेमात पडला.. 'उर्मिला-आदिनाथ'ची प्यारवाली लव्हस्टोरी

नीलेश अडसूळ

Urmila Kanetkar Birthday: मराठी मनोरंजन विश्वातील एक दमदार अभिनेत्री म्हणजे उर्मिला कानेटकर- कोठारे. 'शुभमंगल सावधान' या चित्रपटातून तिने चित्रपट विश्वात प्रवेश केला आणि उर्मिला कानेटकर हे नाव चांगलंच गाजलं. तिने आजवर अनेक मालिका आणि चित्रपट केले. सध्या ती स्टार प्रवाह वरील 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत काम करते आहे.

आज उर्मिलाचा वाढदिवस. उर्मिला जितकी अभिनयामुळे आणि कामामुळे चर्चेत असते तितकीच ती तिच्या वैयक्तिक आयुषयामुळे चर्चेत आली होती. मध्यंतरी तिचा आणि आदिनाथ कोठारे यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा झाली होती.

बराच काळ ते दोघे एकत्र दिसले नाहीत. त्यामुळे त्यांच्यात काही बिनसले आहे का, असेही बोलले गेले. पण दोघांनीही यावर कायमच बोलणे टाळले. त्यानंतर ते थेट महेश कोठारे त्यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात एकत्र दिसले.

आज जरी त्यांच्यात काही बिनसले असले तरी एकवेळ अशी होती उर्मिलाला पाहून पहील्या भेटीतच आदिनाथ तिच्या प्रेमात पडला होता. आज उर्मिलाचा वाढदिवस, त्या निमित्ताने पाहूया ही खास लव्हस्टोरी..

(Urmila Kanetkar kothare Birthday urmila adinath kothare love story )

'शुभमंगल सावधान' हा उर्मिलाचा पहिला चित्रपट. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते महेश कोठारे. त्यांना या चित्रपटासाठी नवीन नायिका हवी होती आणि उर्मिलाने तेव्हा नुकतीच करियरची सुरुवात केली होती. या चित्रपटासंदर्भात बोलण्यासाठी महेश यांनी उर्मिलाला त्यांच्या घरी बोलावले होते.

उर्मिला त्यांच्या घरी गेली आणि महेश कोठारे आणि तिचे बोलणे सुरू होते. त्याच वेळी आदिनाथ झोपेतून उठून बाहेरच्या खोलीत आला. त्याने उर्मिलाकडे पाहिले आणि तो पहिल्याच नजरेत तिच्या प्रेमात पडला. त्याच दिवशी त्याने हिच्याशीच लग्न करायचं असं ठरवलं.

पुढे उर्मिलाला हा चित्रपट मिळाला, ती हिट झाला. या चित्रपटात आदिनाथने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. चित्रपटाच्या सेटवर आदिनाथ आणि उर्मिला यांची सतत भेट व्हायची. त्यामुळे त्यांच्यात चांगली मैत्रीही झाली.

पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पुण्यातल्या एका कॅफेत पहिली भेट झाल्यानंतर आदिनाथने उर्मिलाला मुंबईत प्रपोज केले. दोघांनी बरेच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २० डिसेंबर २०११ रोजी दोघे लग्नबेडीत अडकले.

लग्नाच्या काही वर्षानंतर उर्मिला आणि आदिनाथ यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचे नाव जिजा आहे. ती मराठी सिनेसृष्टीतली लोकप्रिय स्टार किड आहे. शिवाय जिजा ही आपल्या आजोबांची म्हणजेच महेश कोठारे याची खूप लाडकी आहे.

सध्या उर्मिला आणि आदिनाथ यांच्या नात्याबाबत बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यात असल्या तरी एकेकाळी ही जोडी मराठीतील एक चर्चेत असणारी जोडी होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Paaru : पारू-आदित्यचं लग्न होणार पण...नव्या प्रोमोने प्रेक्षक नाराज

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT