Urmila Kothare Marathi actress post about her autograph marathi movie Instagram
मनोरंजन

Urmila Kothare: 'मनात लपवून ठेवलेली लव्ह स्टोरी...', हे काय म्हणाली उर्मिला?

उर्मिला कोठारे सोशल मीडियावर अलिकडे भलतीच सक्रिय पहायला मिळत आहे.

प्रणाली मोरे

Urmila Kothare: उर्मिला कोठारे ही अभिनेत्री आहेच पण उत्तम नृत्यांगणा देखील आहे. मुलीच्या जन्मानंतर तिला वेळ देता यावा म्हणून उर्मिलानं अॅक्टिंगमधून ब्रेक घेतला होता पण आपल्या नृत्याची आवड शो च्या माध्यमातून ती अनेकदा जपताना दिसली. बऱ्याच दिवसांनी ती झी मराठी वरील एका मालिकेत लीडमध्ये दिसली त्यामुळे चर्चा सुरू झाली होतीच पण इतक्यात तिनं त्या मालिकेतून एक्झिट घेतली अन् पुन्हा तिचे चाहते नाराज झाले. (Urmila Kothare Marathi actress post about her autograph marathi movie)

पण आता दिसत आहे की उर्मिला हळूहळू अॅक्टिंगमध्ये पुन्हा सक्रिय होत चाललीय. रानबाजार या वेबसिरीजमध्ये देखील तिची भूमिका लक्षवेधी ठरली. त्यानंतर सुमित राघवनसोबत एकदा काय झालं सिनेमातही तिनं उल्लेखनीय काम केलेलं नजरेस पडलं. इतकं सगळं उत्तम उर्मिलाच्या आयुष्यात घडत असतानाच मध्येच तिच्या आणि आदिनाथ कोठारेच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी आल्य़ाची बातमी पसरली होती.

यावर आदिनाथनं भले सगळ्या अफवा आहेत असं सांगून बातमीवर पडदा टाकला असला तरी उर्मिलानं मात्र याप्रकरणावर काहीच भाष्य केलेलं नाही. त्यामुळे अजूनही हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. म्हणूनच आता उर्मिलानं केलेली एक पोस्ट कॅप्शन वाचल्यावर चर्चेत आली. हो,पण तिनं पोस्ट केलेला व्हिडीओ पाहिला की उर्मिला नेमकं कशाविषयी बोलतेय याचा उलगडा होऊन जातो पटकन.

उर्मिलानं केलेली पोस्ट ही तिच्या आगामी सतीश राजवाडे दिग्दर्शित ऑटोग्राफ सिनेमाची आहे. या सिेनमात तिच्यासोबत अंकुश चौधरी आणि अमृता खानविलकर मुख्य भूमिकेत आहेत. उर्मिलानं सिनेमाचा टिझर पोस्ट करत लिहिलं आहे,''मनात एक तरी लपवून किंवा जपून ठेवलेली लव्ह स्टोरी असते .....!''
तुमची कोणती आहे?
ऑटोग्राफ....
३० डिसेंबरपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांत!

उर्मिलानं कॅप्शनमध्ये जे काही लिहिलं होतं ते नजरेस पडल्यानं आधी चाहते गोंधळलेच होते ना राव. असो,आता मनातला गोंधळ मिटला असेल तर उर्मिलानं जे विचारलंय ते शेअर करा पटकनं...आपल्या मनात लपवलेली लव्हस्टोरी...सांगताय ना...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026 Wishes in Marathi: "गजानना श्री गणराया..." गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा गणेशभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

टीम इंडियाने नक्वींकडून आशिया कपची ट्रॉफी का घेतली नाही? BCCIने सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2026: गणेशभक्तांनो, मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा! पहाटे ४.५० ते दुपारी १.५१ पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना

Bombay High Court: ‘स्मोकिंग तंबाखू’ खाद्यपदार्थ नाही; एफएसएस कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi News Live Updates : कसबा गणपती मंदिरासमोर ढोल-ताशांचा गजर; ‘भेसळ रोखा’चे फ्लेक्स लक्षवेधी

SCROLL FOR NEXT