Urvashi Rautela With Surya Kumar Yadav Esakal
मनोरंजन

Urvashi Rautela Surya Kumar Yadav: उर्वशी -सुर्यकुमार एकत्र! ऋषभच्या चाहत्यांना धक्का...नवीन व्हिडिओनं उडाली खळबळ

Vaishali Patil

Urvashi Rautela With Surya Kumar Yadav: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही नेहमीच तिच्या कामामुळे कमी आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. गेल्या काही काळापासून ती क्रिकेटमुळे चर्चेत आहे. उर्वशी आणि टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत यांच्यातील वाद तर सर्वांनाच चांगलाच माहित आहे.

आता पुन्हा उर्वशीने भारतीय क्रिकेट संघाच्या आणखी एका खेळाडूसोबत हातमिळवणी केली आहे. मात्र तो ऋषभ पंत नसून क्रिकेटर सूर्य कुमार यादवसोबत आहे. त्याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोघेही लवकरच ब्रँड एंडोर्समेंट आणि पार्टनरशिपसाठी एकत्र काम करणार आहेत.

उर्वशी रौतेला ही भारतात कमी मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरही खूप प्रसिद्ध आहे. तिच्या चाहत्यांची संख्याही काही कमी नाही. तर सूर्या देखील भारतीय क्रिकेट संघाचा लोकप्रिय स्टार आहे. दोघांच्या लोकप्रियेतेचा फायदा नक्कीच कंपनीला होईल, या हेतुने दोघांची निवड करण्यात आल्याच्या चर्चा आहेत.

एका आंतरराष्ट्रीय फॅशन आणि लाइफस्टाइल ब्रँडने यासाठी उर्वशी आणि सुर्याची नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. त्यामुळे आता उर्वशी रौतेला आणि सूर्य कुमार यादवची जोडी धमाल करणार आहे.

दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात सूर्याचा स्टायलिश लूक दिसतोय. ब्रँडच्या ब्लॅक हुडीमध्ये सूर्या डॅशिंग दिसतोय तर उर्वशीही तिच्या सौदर्यांने सर्वांना घायाळ करत आहे.

उर्वशीच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास ती लवकरच बॉलीवूडच्या दिवंगत प्रसिद्ध अभिनेत्री परवीन बाबी यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. 'इन्स्पेक्टर अविनाश' मध्ये रणदीप हुड्डासोबत देखील ती दिसली. त्याचबरोबर उर्वशी थ्रिलर सिनेमा 'ब्लॅक रोज' मध्ये मध्यवर्ती भूमिका निभावणार आहे. साऊथचा 'थिरुट्टू पायले २' च्या हिंदी रीमेकमध्ये देखील ती काम करताना दिसणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Honey Trap Miraj : बुलाती है मगर जानेका नहीं! सोशल मीडियाचा नाद लावून पोरं बाद करणारी टोळी, मिरजेत फोटो, व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; कोल्हापूर कनेक्शन

Jalna Crime: पोलिस रेकॉर्डवरील एकाचा खून; जालन्यात थरार, जमिनीच्या वादातून चौघांकडून सशस्त्र हल्ला

नेते अन्‌ कार्यकर्त्यांनो सावधान ! 'साेलापुरात बाईक रॅली काढाल तर गुन्हा दाखल'; पोलिस आयुक्तांचे काय आहेत नियम?

Solapur News: 'साेलापूर जिल्ह्यातील ७८ हजार शेतकऱ्यांचे फार्मर आयडी प्रलंबित'; शेतकऱ्यांना अतिवृष्टी भरपाई मिळेना..

Tamhini Ghat Accident एकमेकांचे जिवलग मित्र… मिळून थार घेतली; ताम्हिणी घाटात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची हृदयद्रावक करुणकथा

SCROLL FOR NEXT