Urvashi Rautela esakal
मनोरंजन

Urvashi Rautela: आता उर्वशी झाली यश चोप्रांची शेजारीन! जुहूमधील बंगल्यात शिफ्ट..

Vaishali Patil

अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. उर्वशी रौतेला नुकतीच कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२३ मध्ये सहभागी झाली होती. जिथून त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. उर्वशी रौतेलाही तिच्या कान्स लूकमुळे ट्रोल झाली होती.

उर्वशी रौतेलाही हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध सौदर्यवती आहे. ती तिच्या निरागस सौंदर्य आणि जबरदस्त लुकसाठी प्रसिद्ध आहे. ती नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती तिच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असते. आता नुकतिच तिच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे.

उर्वशी गेल्या सात-आठ महिन्यांपासून मुंबईत स्वत:साठी घर शोधत होती आणी आता तिला ते भेटलं देखील आहे. ETimes च्या रिपोर्टनुसार, आता उर्वशी यश चोप्रा यांच्या जुहू येथील बंगल्याजवळील बंगल्यात शिफ्ट झाली आहे.

या वृत्तात सांगितल्यानुसार, यापूर्वी उर्वशीला लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये राहण्यासाठी 'सेलेस्ट' नावाचा बंगला तयार करण्यात आला होता. पण ती त्यात राहण्यासाठी जावु शकली नाही. त्यातच आता ती तिच्या जुहूच्या बंगल्यात शिफ्ट झाली आहे. ज्याला उर्वशीने खूप सुंदर सजवले आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर उर्वशी दोन-तीन महिन्यांपूर्वीच या बंगल्यात शिफ्ट झाली होती.

उर्वशीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच राम पोथिनेनीसोबतही दिसेल. तसंच, 'इन्स्पेक्टर अविनाश' मध्ये रणदीप हुड्डासोबत देखील ती दिसली. उर्वशी थ्रिलर सिनेमा 'ब्लॅक रोज' मध्ये मध्यवर्ती भूमिका निभावणार आहे. तसंच साऊथचा 'थिरुट्टू पायले २' च्या हिंदी रीमेकमध्ये देखील ती काम करताना दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GOBAR-DHAN Scheme : पेट्रोलमध्ये इथेनॉल नंतर आता CNG-PNG मध्येही बायोगॅस मिसळला जाणार, सरकारची मोठी घोषणा

Dill Leaf Recipe: शेपूच्या पानांचा नवा ट्विस्ट! बनवा कर्नाटकातील प्रसिद्ध 'अक्की रोटी'

आजचे पंचांग 7 ऑगस्ट 2026! शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि दिनविशेष जाणून घ्या

आजचे राशिभविष्य - ७ ऑगस्ट २०२६

युरिक ॲसिड - शरीरात वाढणारी आम्लता

SCROLL FOR NEXT