Urvashi Rautela Birthday News esakal
मनोरंजन

Urvashi Rautela : होऊ दे खर्च! उर्वशीच्या वाढदिवसाला चक्क 'तीन कोटीं'चा केक? हनी सिंगचं मोठं गिफ्ट

उर्वशीच्या जन्मदिनाच्या (Urvashi Rautela Viral News) निमित्तानं तिला हनी सिंहनं तीन कोटींचा केक दिल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

युगंधर ताजणे

Urvashi Rautela News: सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रेटी कोण असं विचारलं तर त्या नावांमध्ये उर्वशीचे नाव हमखास येणार. उर्वशीनं तिच्या सौंदर्यानं (Urvashi Rautela viral video) आणि हटक्या स्टाईलनं चाहत्यांना घायाळ केलं आहे. मनोरंजन विश्वातील वेगवेगळ्या गॉसिपिंगमध्ये देखील उर्वशी ही नेहमीच चर्चेत असल्याचे दिसून आले आहे.

उर्वशी आणि रॅपर यो यो हानी सिंहचा तो फोटो व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांच्या (Urvashi Rautela birthday news) चर्चेला उधाण आले आहे. नुकताच उर्वशीचा बर्थ डे सेलिब्रेट करण्यात आला. आता उर्वशीचा बर्थ डे म्हटल्यावर त्याची चर्चा होणारच. यावेळी तिच्या बर्थ डे ला चक्क गोल्डन केक कापण्यात आला. ज्याची किंमत तब्बल तीन कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी बर्थ डे च्या दिवशीही तिला ट्रोल केले आहे.

दुसरीकडे असेही म्हटले जात आहे की उर्वशी आणि हनी सिंह हे त्यांच्या आगामी एका म्युझिक व्हिडिओसाठी एकत्र आले आहेत. त्यानिमित्तानं गोल्डन केकचे व्हायरल (Urvashi Rautela birthday golden cake news) झालेल्या फोटोंवरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. बॉलीवूडची ब्युटी क्वीन म्हणून जिचं नेहमीच नाव घेतलं जातं त्या उर्वशीनं काल (२५ फेब्रुवारी) रोजी तिचा ३० जन्मदिन साजरा केला असून त्याचे फोटो नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे.

बर्थ डे पार्टीच्या निमित्तानं व्हायरल झालेला तो फोटो सध्या ट्रेडिंगचा विषय आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असं म्हटलं जात आहे की, उर्वशीच्या बर्थ डे च्या निमित्तानं खास २४ कॅरेट गोल्ड पासून गोल्डन केक तयार करण्यात आला आहे. त्या केकच्या किंमतीवरुन सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. असं म्हटलं जात आहे की, तो केक यो यो हनी सिंहनं उर्वशीला गिफ्ट केला आहे.

हनी सिंहनं असा दावा केला आहे की तो केक तीन कोटी रुपयांचा आहे. दुसरीकडे नेटकऱ्यांनी केवळ गोल्ड प्लेट लावून त्या केकची सजावट करण्यात आली असून प्रसिद्धीसाठी त्याची किंमत वाट्टेल तेवढी सांगितली जात असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT