Urvashi Rautela IPL Match present Mumbai Indians  
मनोरंजन

Urvashi Viral Video : माझा रिषू काही दिसेना...उर्वशी आली पण निराश झाली! घडलं काय?

उर्वशी जेव्हा आली तेव्हा चाहत्यांनी ऋषभ, ऋषभच्या नावानं घोषणा देण्यास सुरुवात केली. तो व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Urvashi Rautela IPL Match present Mumbai Indians Viral Video : उर्वशी रौतेला आणि भारतीय क्रिकेटर ऋषभ पंत यांच्यात मैत्री आहे की आणखी काही याविषयी चाहत्यांना नेहमीच प्रश्न पडतो. ऋषभला अपघात झाल्यापासून त्यावरुन सेलिब्रेटी उर्वशीला ट्रोल केले जात आहे. काल तर मुंबई विरुद्ध दिल्लीच्या सामन्यात उर्वशी येताच चाहत्यांना झालेला आनंद गगनात मावेनासा झाला होता.

ऋषभ पंतच्या अपघातानंतर सध्या तरी त्याच्या अनुपस्थितीशिवाय दिल्ली संघाला खेळावे लागत आहे. कालच्या सामन्यात मुंबईची सरशी झाल्याचे दिसून आले. मात्र यासगळ्यात दिल्लीनं देखील मुंबईला सहजासहजी विजय मिळवू दिला नसल्याचे दिसून आले. हा सामना पाहण्यासाठी उर्वशी जेव्हा आली तेव्हा चाहत्यांनी ऋषभ, ऋषभच्या नावानं घोषणा देण्यास सुरुवात केली. तो व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Also Read - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

यापूर्वी देखील ऋषभ पंतवरुन उर्वशी ट्रोल झाल्याचे दिसून आले आहे. ऋषभ हा आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघाचा कॅप्टन होता. मात्र तो सध्या अपघातग्रस्त असल्यानं त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्यातून तो लवकर बरा व्हावा यासाठी चाहत्यांनी त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत. यासगळ्यात सोशल मीडियावर मात्र उर्वशी आणि ऋषभ पंतचे भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे दिसून आले आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी उर्वशीला ट्रोल देखील केले आहे.

गेल्या सामन्यात देखील उर्वशीनं हजेरी लावल्याचे दिसून आले होते. त्यातही प्रेक्षकांनी जेव्हा तिला पाहिले तेव्हा ऋषभ, ऋषभच्या नावाचा घोष सुरु केला होता. ४ एप्रिल रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्याला ऋषभनं उपस्थिती लावली होती. त्यावेळी चाहत्यांना कमालीचा आनंद झाला होता. त्या सामन्याला मात्र उर्वशी नव्हती. आता उर्वशीनं मुंबई विरुद्धच्या सामन्याला हजेरी लावली तर तेव्हा ऋषभ नसल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT