Urvashi Rautela Esakal
मनोरंजन

Urvashi Rautela: उर्वशी अन् क्रिकेटचं नातचं जूनं! 'वर्ल्ड कप 2023'च्या ट्रॉफीसोबत फोटो शेयर करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Vaishali Patil

Urvashi Rautela Trolled: बॉलीवूडमधील सौदर्यंवती अभिनेत्री म्हणजे उर्वशी रौतेला ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहते. ती नेहमी असं काहीतरी करते की त्याची चर्चा रंगते.

त्यातच आता पुन्हा तिची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिने पॅरिस, फ्रान्समधील आयफेल टॉवरखाली 'क्रिकेट वर्ल्ड कप 2023' ट्रॉफीची झलक दाखवत पुन्हा एकदा इतिहासात तिचं नाव कोरले आहे. असं करणारी उर्वशीने ही पहिली अभिनेत्री बनली आहे असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

उर्वशी रौतेलाने 2023 च्या वर्ल्ड कप ट्रॉफीसह तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिचे हे फोटो पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे तर काहींनी नेहमीप्रमाणे तिला ट्रोल केलं आहे. 'तु आपल्या देशाची शान आहेस, आयफेल टॉवरच्या खाली क्रिकेट विश्वचषक 2023 ची ट्रॉफी चमकतेय, तू पुन्हा हे सिद्ध केलं' अशा अनेक कमेंट तिचे चाहते करत आहेत.

तर दुसरीकडे फोटो शेयर करताच नेटकऱ्यांनी तिला पुन्हा खूप ट्रोल केले आहे.

त्याचे झालं असं की, या फोटोसोबत उर्वशीने लिहिले आहे की ती वर्ल्ड कप ट्रॉफीसोबत दिसणारी ती पहिली सेलिब्रिटी आहे. मात्र याआधी सुपरस्टार शाहरुख खानचा वर्ल्ड कप ट्रॉफीसोबतचा फोटो आयसीसीने आपल्या प्रोमोमध्ये शेअर केला होता.

तर काहींनी तिला आठवण करुन दिली की, "शाहरुख खान या ट्रॉफीसोबत फोटो शेयर करणारा पहिला कलाकार आहे."

तर दुसऱ्याने लिहिलयं की, 'तू पहिले बाजूला हो',तर एकानं लिहिलयं की, "तिने ऋषभ पंतच्या आधी ट्रॉफीला स्पर्श केला." तर एकानं तिला स्वतःच्याच तोंडाने स्वतःची प्रशंसा करणे थांबवा असा सल्ला दिला आहे.

योवेळी भारतात होणाऱ्या या वर्ल्ड कप मध्ये आत्तापर्यंत 10 संघ निश्चित झाले आहेत. या यादित भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान, श्रीलंका आणि नेदरलँड या देशाच्या नावाचा सामावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gutkha Ban: आता गुटखा विक्रेत्यांची खैर नाही! फक्त बंदी नाही, थेट मकोका...; महाराष्ट्र सरकारचा मोठा धडाका

Who is Rajan Patil : अजित पवारांचा डाव उधळणारा पठ्ठ्या! अनगरच्या रणांगणातून राजकीय ठिणगी पेटवणारे राजन पाटील कोण?

Viral Video: मलायका अरोराचा हटके स्टंट! स्पर्धकाच्या डोक्यावर ठेवला गॅस, अन् बनवला चहा, व्हिडिओ चर्चेत

Rahul Gandhi: ''राहुल गांधी निवडणूक आयोगाला बदनाम करत आहेत'', देशातल्या 272 दिग्गजांनी लिहिलं खुलं पत्र

Maharashtra CET Exam: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! आता CET परीक्षा वर्षातून तीनदा होणार, वाचा नवीन नियम

SCROLL FOR NEXT