Urvashi Rautela esakal
मनोरंजन

Urvashi Rautela : उर्वशी थोडक्यात वाचली नाहीतर, सेल्फीच्या नादात...

उर्वशी ही एका कार्यक्रमाच्या निमित्तानं जयपूरमध्ये गेली होती. त्यावेळी तिला पाहण्यासाठी हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती.

सकाळ डिजिटल टीम

Urvashi Rautela shocking incident jaypur fashion acadmey : बॉलीवूडची अभिनेत्री उर्वशी रौतेला ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या स्टाईलसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. याशिवाय ती तिच्या परखड वक्तव्यामुळे देखील प्रसिद्ध आहे. उर्वशीच्या अपघाताबाबत एक बातमी व्हायरल झाली आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

उर्वशी ही एका कार्यक्रमाच्या निमित्तानं जयपूरमध्ये गेली होती. त्यावेळी तिला पाहण्यासाठी हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. फॅशन आणि ग्लॅमर अॅकडमीच्या उद्घघाटनप्रसंगी ती गेली होती. त्याचवेळी झालेल्या त्या एका प्रसंगानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले. चाहत्यांनी तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होती.

Also Read - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

त्याचे झाले असे की, उर्वशी तिच्या चाहत्यांसोबत सेल्फी घेण्यात गुंग होती. त्यानंतर ती केक कापण्यासाठी आली असताना त्या मेणबत्ती पेटवताना तो प्रसंग घडला. त्यात एका मुलीच्या चेहऱ्यावरच आग आली आणि त्यात तिचे केस जळाले. हा प्रसंग पाहून उर्वशीही घाबरून गेली. तिनं त्या मुलीला ताबडतोब रुग्णालयात नेण्यास सांगितले. बराचकाळ या घटनेची चौकशी सुरु होती. एवढेच नाहीतर उर्वशीनं ती मुलगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर देखील तिची तिनं विचारपूस केल्याचे दिसून आले.

उर्वशीची ही गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर ऋषभ पंतमुळे चर्चेत आली आहे. तिला ऋषभच्या नावावरुन ट्रोल केले जात आहे. ऋषभला अपघात झाल्यानंतर नेटकऱ्यांनी उर्वशीला चिडवण्यास सुरुवात केली होती. तिनं देखील त्याच्यासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेयर केली होती. एवढेच नव्हे तर तिच्या आईनं देखील ऋषभच्या प्रकृतीसाठी खास पोस्ट शेयर करत देवाकडे प्रार्थना केली होती. त्याचीही चर्चा झाली होती.

उर्वशीच्या वर्क प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास, ही आता लवकरच हॉलीवूडमध्ये डेब्यु करणार आहे. ती ३६५ मायकेल मॉरी सोबत दिसणार आहे. याशिवाय इन्स्पेक्टर आविनाश मध्ये प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुड्डासोबत दिसणार आहे. उर्वशीच्या नावाची मोठी चर्चा आहे. ती ब्लॅक रोझमध्ये देखील दिसणार असून साऊथच्या थ्रिथू पायल २ च्या हिंदी रिमेक मध्ये भूमिका करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT