urvashi rautela viral video during ind vs pak wc 2023 match  SAKAL
मनोरंजन

Ind Vs Pak: तिकडे पाकिस्तान ऑलआऊट अन् इकडे प्रेक्षक क्लीन बोल्ड, उर्वशीच्या रुपात स्टेडियममध्ये निळं वादळ

भारत - पाकिस्तान सामन्यात उर्वशीच्या हजेरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय

Devendra Jadhav

Ind Vs Pak Urvashi Rautela: भारत - पाकिस्तान सामना रंजक वळणावर आहे. या सामन्याला अनेक बॉलिवूड तारे - तारकांनी उपस्थिती दर्शवली आहे. अशातच मॉडेल - अभिनेत्री उर्वशी रौतेला सुद्धा भारत - पाकिस्तान सामना पाहायला आली. उर्वशी टीम इंडियाला चिअर करण्यासाठी थेट मैदानात पोहोचली आहे. आज सुरु असलेल्या भारत - पाकिस्तान मॅचदरम्यानचा उर्वशीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय.

(urvashi rautela viral video during ind vs pak wc 2023 match)

उर्वशीच्या उपस्थितीने वेधलं सर्वांचं लक्ष

उर्वशीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात पाहायला मिळतं की, उर्वशी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत - पाकिस्तान सामन्यासाठी उपस्थित आहे. 1 लाखाहून अधिक प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या या स्टेडियममध्ये उर्वशी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याचा आनंद घेताना दिसत आहे. यावेळी, उर्वशी रौतेलाने स्टायलिश निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी उर्वशीने हा खास ड्रेस परिधान केलाय असं बोललं जातंय.

तिकडे पाकिस्तान ऑलआऊट आणि इकडे उर्वशीने वेधलं सर्वांचं लक्ष

भारत - पाकिस्तान सामना रंजक वळणावर आहे. भारताने उत्कृष्ट बॉलिंगच्या जोरावर पाकिस्तानला ऑलआऊट केलं आहे. पण उर्वशीच्या उपस्थितीने स्टेडियममधील अनेकजण तिचं सौंदर्य पाहून क्लीन बोल्ड झाले असतील शंका नाही.

भारत - पाकिस्तान सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, पहिली इनिंग संपली असून भारताला पाकिस्तानला हरवण्यासाठी १९२ रन्सचं टार्गेट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीत भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, सहा वारकरी जखमी

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT