Urvashi Rautela Rishabh Pant esakal
मनोरंजन

Urvashi rautela: उर्वशीच्या गळ्यात ऋषभ पंतची चेन? काही तरी झोल आहे रे बाबा!

सकाळ डिजिटल टीम

 यंदाच्या टी-२० विश्वचषकातील खेळाडूंची कमी आणि अभिनेत्री उर्वशी रौतेलाची चर्चा जोरात सुरु आहे. तिचं आणि ऋषभचं प्रकरण हे तर आता सर्वांनाच ठाऊक आहे. तिचं ऑस्ट्रेलियाला जाणं म्हणजे त्याचा पाठलाग करणं असा अंदाज लोकांनी लावला आणि तिला जोरदार ट्रोल केलं.

त्यातच तिनं बरेच काही प्रेमयुक्त किंवा प्रेमभंगाच्या शायरीसह फोटो आणि व्हिडिओ शेअर केलेत ज्यामुळे तिची आणि ऋषभची नेटकऱ्यांनी चांगलीच खबर घेतली. एकीकडे ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या मैदानात भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरू आहे. त्यातच पुन्हा उर्वशीची पोस्ट चर्चेत आली आहे.या व्हिडिओत ती तिच्या स्वप्नांचा राजकुमार शोधत आहे. ती या व्हिडिओत एक जाहिरात करत आहे.मात्र या जाहिरातीत तिने घातलेल्या एक वस्तूने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. ती म्हणजे उर्वशीने गळ्यात घातलेली चेन.

ही चेन पाहून लोकांना ऋषभची पुन्हा आठवन झाली आहे.उर्वशी रौतेलाने गळ्यात घातलेली चैन ऋषभ पंतची आहे असा दावा केला जात आहे.तिच्या या व्हिडिओनंतर त्यातील स्क्रिनशॉट ऋषभच्या जुन्या फोटोबरोबर जोडण्यात आला आहे. या दोन्ही फोटोंमध्ये दोघांनी परिधान केलेल्या चेन सारख्याच आहेत. सोशल मीडियावर हे ट्वीट तुफान व्हायरल झाले आहे. तिच्या फोटोवर अनेक कमेंटही येत आहे.

अभिनेत्री उर्वशी रौतेलाबाबत भाष्य करणाऱ्या विविध पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्या आहेत. यातील एका पोस्टने विशेष लक्ष वेधूून घेतले आहे. ट्विटरवर दावा केला जात आहे की उर्वशी रौतेलाने गळ्यात घातलेली चैन ऋषभ पंतची आहे.  आता ही चेन ऋषभची आहे का किंवा तिची जर त्यांची असेल तर तिच्याकडे कशी असे अनेक प्रश्न आता नेटकऱ्यांना पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT