usha nadkarni sushant singh rajput cant commit suicide file image
मनोरंजन

वर्षभरात तपासणी पूर्ण का नाही? उषा नाडकरणींना हत्येचा संशय

सुशांतबद्दल मुलाखतीमध्ये उषा यांनी त्याच्यासोबत असलेल्या प्रेमळ नात्याबद्दल सांगितले.

प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या (sushant singh rajput) मृत्यूला 14 जूनला एक वर्षं होतं आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी (usha nadkarni)यांनी सुशांतबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रसिद्ध हिंदी मालिका 'पवित्र रिश्ता' मध्ये सुशांत आणि उषा यांनी एकत्र काम केले होते. सुशांतबद्दल मुलाखतीमध्ये उषा यांनी त्याच्यासोबत असलेल्या प्रेमळ नात्याबद्दल सांगितले.(usha nadkarni sushant singh rajput cant commit suicide)

उषा यांनी मुलाखतीमध्ये सांगितले, 'सुशांत स्वप्न बघणारा मुलगा होता. अवघ्या 23-24 वर्षांचा तो मुलगा मोठी स्वप्न घेऊन आला होता. मालिकांमधून सिनेमामध्ये गेला. तिथेही त्याला चांगले सिनेमे मिळाले. त्याला जे हवं ते सगळं मिळत होतं. शिवाय त्याचे त्यानंतर काय करायचं याचे प्लॅनही होते. असं असणारा सुशांत आत्महत्या करूच शकत नाही. मला खात्रीनं वाटतं त्याला मारलं गेलं असणार'. पवित्र रिश्ता या मालिकेच्या शूटिंग वेळी सुशांत 23-24 वर्षांचा होता. यावेळी तो उषा यांच्या सोबत सेटवर गप्पा मारत असे.

पवित्र रिश्ता मालिकेची आठवण सांगताना उषा म्हणाल्या, 'आम्ही सेटवर भेटायचो,बोलायचो. तो फारच मोकळा होता. सतत काहीतरी वाचत असायचा. त्यावेळी मला आठवतं. त्याला बांद्र्यात फ्लॅट घ्यायचा होता. त्याची किंमत होती दोन कोटी रूपये. मला म्हणाला, ताई मला बांद्रा येथे फ्लॅट घ्यायचा आहे. मी त्याला विचारलं, अरे तू इतके पैसे कसे कमावणार. तर मला म्हणाला, करेंगे ताई. तो हसतमुख होता. या इंडस्ट्रीत येऊन काय करायचं हे त्यानं ठरवलं होतं.असा मुलगा आत्महत्या कशी करेल? माझ्या मनाला ते पटत नाही. माझं मन सांगतं त्याची हत्याच झाली असणार. नाहीतर मला सांगा, गेल्या वर्षभरापासून त्याच्या मृत्यूचा तपास चालू आहे. अजून काहीच कसं का हाती लागलेलं नाही? पोलिसांपासून भारतातल्या मोठ्या मोठ्या तपास यंत्रणा या कामात लागल्या आहेत. वर्ष झालं तरी सुशांतचं नेमकंं काय झालं ते यांना कळलेलं नाही? मग तपासही लागत नसेल तर मग काहीतरी काळंबेरं असणार आहे असं वाटू लागतं. आणि तसं का वाटू नये? '

मुलाखतीमध्ये उषा यांनी सांगितले की जेव्हा त्यांच्या हेअर ड्रेसरने सुशांतच्या मृत्यूची बातमी त्यांना सांगितली तेव्हा त्यांना विश्वासच बसत नव्हता. सुशांतचा 14 जून 2020 रोजी कार्टर रोडवरच्या राहत्या घरात मृत अवस्थेत आढळला. गेल्या वर्षभरापासून सीबीआय त्याच्या मृत्यूचा तपास करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026 Wishes in Marathi: "गजानना श्री गणराया..." गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा गणेशभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

टीम इंडियाने नक्वींकडून आशिया कपची ट्रॉफी का घेतली नाही? BCCIने सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2026: गणेशभक्तांनो, मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा! पहाटे ४.५० ते दुपारी १.५१ पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना

Bombay High Court: ‘स्मोकिंग तंबाखू’ खाद्यपदार्थ नाही; एफएसएस कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi News Live Updates : मयूर रथातून दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक; रंगीबेरंगी फुलांनी सजला रथ; सकाळी ८ वाजता मुख्य मंदिरातून मिरवणुकीला सुरुवात

SCROLL FOR NEXT