vaibhav mangale talks about marathi drama theatre uncleanliness and marathi rangbhumi din  sakal
मनोरंजन

Vaibhav mangale: नाटकाविषयीचं हे प्रेम अत्यंत पोकळ.. वैभव मांगले यांचे खडेबोल..

अभिनेते वैभव मांगले यांनी रंगभूमी वरील अनास्थेविषयी मोठे विधान केले आहे.

नीलेश अडसूळ

<iframe src="https://omny.fm/shows/sakalchya-batmya/33691ae6-7e85-4859-be4e-af450076d4f4/embed" width="100%" height="180" allow="autoplay; clipboard-write" frameborder="0" title="Sakal Unplugged - नाटकाविषयीचं प्रेम अत्यंत पोकळ आणि बेगडी.. वैभव मांगले यांनी कुणावर केली टीका"></iframe>vaibhav mangale: अभिनेता वैभव मांगले सध्या बरेच चर्चेत आहेत. नुकताच येऊन गेलेला त्यांचा टाइमपास 3 सिनेमा असो किंवा सध्या जी मराठी वरील 'डान्स महाराष्ट्र डान्स' कार्यक्रमात ते साकारत असलेली चिंची चेटकीणीची भूमिका असो. शिवाय वैभव सातत्याने विविध विषयांवर भाष्य करत असतो. नुकत्याच झालेल्या मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने त्यांनी त्याने सकाळ unplugged पॉडकास्ट मध्ये खास मुलाखत दिली. यावेळी त्याने रंगभूमीवरील विविध विषयांवर भाष्य केले आणि काही मुद्यांवर सडेतोड टीकाही केली.

(vaibhav mangale talks about marathi drama theatre uncleanliness and marathi rangbhumi din)

या मुलाखतीत ते म्हणाले 'नाटकाविषयीचं हे प्रेम अत्यंत पोकळ आणि बेगडी आहे..' त्याममागे कारणही तसेच आहे. मराठी रंगभूमी दिन नुकताच पार पडला. यानिमित्ताने अनेक कलाकारांनी आपल्या आठवणी शेअर केल्या तर काहींनी रंगभूमीवरील अडचणी मांडल्या. नाट्यगृह दुरवस्था, स्वच्छता अशा अनेक चुका काढत प्रशासनाने त्यात सुधारणा करण्याची मागणी केली गेली. त्याच अनुषंगाने प्रशासनाला नाटकाप्रती अनास्था आहे का, असे विचारण्यात आले. यावेळी वैभव यांनी मात्र अत्यंत स्पष्ट शब्दात उत्तर दिले.

'आपण केवळ सरकारच्या हलगर्जीपणा बाबत बोलून चालणार नाही. दोष आपलाही आहे. ते नाट्यगृह आपणही वापरतो. कलाकार आणि प्रेक्षकही तिथेच येत असतात त्यामुळे आपण किती आस्था राखतो, आपण किती नियमांच पालन करतो याचाही विचार करायला हवा. केवळ प्राशसनाकडे बोट करून चालणार नाही. कारण आपण जे काही नाटकाविषयीच प्रेम दाखवतो ते अत्यंत पोकळ आणि बेगडी आहे. खऱ्या अर्थाने आपण कुणीच नाटकासाठी किंवा रंगभूमीसाठी सर्वार्थाने काहीही करत नाही.' असे खडेबोल त्यांनी सुनावले.

याशिवाय नवे रंगकर्मी, नवे लेखक आणि रंगभूमीवर वावरताना वाटणारी खंत त्यांनी या मुलाखतीत व्यक्त केली. ती ऐकण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा आणि 'अभिनेते वैभव मांगले यांची 'सकाळ unplugged' पॉडकास्ट ही विशेष मुलाखत नक्की ऐका..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT