Vaibhav Mangle Marathi Actor Santosh Pawar Writer Murdurwale Kulkarn esakal
मनोरंजन

New Marathi Drama : ‘मर्डरवाले कुलकर्णी’ मध्ये वैभव आणि संतोषची जोडी जमली! नव्या थाटात, नव्या रुपात येणार प्रेक्षकांसमोर

आता वैभव मांगले यांनी चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. त्यांचे एक विनोदी नाटक चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

युगंधर ताजणे

Vaibhav Mangle Marathi Actor Santosh Pawar Writer Murdurwale Kulkarni : मराठी चित्रपट विश्वामध्ये आपल्या अभिनयानं आणि अफलातून कॉमेडीच्या टायमिंगनं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे दिग्गज अभिनेते म्हणून वैभव मांगले यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मांगले हे नेहमीच चाहत्यांशी वेगवेगळ्या माध्यमातून संवाद साधत असतात.

आता वैभव मांगले यांनी चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. त्यांचे एक विनोदी नाटक चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्याची जोरदार चर्चाही सुरु झाली आहे. वैभव मांगले आणि लेखक-दिग्दर्शक अभिनेते संतोष पवार हे विनोदाचे दोन हुकमी एक्के रंगमंचावर एकत्र येत धमाल उडविण्यास सज्ज झाले आहेत.

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

‘मर्डरवाले कुलकर्णी’ या आगामी नाटकात हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. येत्या २४ नोव्हेंबरला हे नाटक रंगभूमीवर दाखल होणार आहे. वैभव मांगले यात मध्यवर्ती भूमिकेत असून संतोष पवार यांच्या भन्नाट दिग्दर्शनाखाली या नाटकाचा पट रंगला आहे. अष्टविनायक संस्थेचे दिलीप जाधव यांनी नाटकाची निर्मिती केली असून सहनिर्मात्या मयुरी मांगले आणि निवेदिता सराफ आहेत.

प्रेक्षकांना मनमुराद हसवण्यासाठी आम्ही सज्ज असून आमच्या दोघांची केमिस्ट्री ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकामध्ये सॉलिड धमाल आणेल, असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला. एकत्र काम करताना आम्हाला खूपच मजा आल्याचे हे दोघेही सांगतात.

अष्टविनायक संस्थेच्या ‘मर्डरवाले कुलकर्णी’ नाटकाचे लेखन जयंत उपाध्ये यांचे असून या निखळ कौटुंबिक मनोरंजक नाटकात भार्गवी चिरमुले, निमीश कुलकर्णी, सुकन्या काळण, विकास चव्हाण आदि कलाकारांच्याही भूमिका आहेत.

या नाटकाची गाणी वैभव जोशी यांनी लिहिली असून नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे आहे. प्रकाश योजना रविरसिक तर संगीत आशुतोष वाघमारे यांचे आहे. संतोषची दिग्दर्शनाची अनोखी शैली आणि वैभव यांच्या अभिनयाचा हटके अंदाज ‘मर्डरवाले कुलकर्णी’ मधून प्रेक्षकांना जिंकून घेणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. घालणार हे नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT