Vaibhav Mangle Post On Social Media Bhalchandra Nemade Controversial Statement On Aurangzeb  Esakal
मनोरंजन

Vaibhav Mangle: 'एवढ्या मोठ्या लेखकानं जर....' मराठी अभिनेते वैभव मांगलेंची नेमाडेंवर नाव न घेता टीका

भालचंद्र नेमाडे यांनी दोन दिवसांपूर्वी मुघल बादशहा औरंगजेबाबाबत आणि पेशव्याबाबत काही वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.

Vaishali Patil

Vaibhav Mangle News:  मराठी मराठी साहित्यक्षेत्रात कोसला कादंबरीनं लोकप्रिय झालेले आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे भालचंद्र नेमाडे हे त्यांच्या लिखानामुळे जितके प्रसिद्ध आहेत तितकेच ते त्याच्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यातही अडकतात. अनेक वेळी भालचंद्र नेमाडे हे त्याच्या वादग्रस्त विधानंमुळे प्रकाशझोतात येतात आणि नवीन वाद तयार होतो.

भालचंद्र नेमाडे यांनी दोन दिवसांपूर्वी मुघल बादशहा औरंगजेबाबद्दल आणि पेशव्याबद्दलकाही वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. ज्यामुळे त्यांच्यावर टिका होत आहे. या विधानामुळे पुन्हा ते वादाच्या भोवऱ्यात अडकणार असल्याचं चित्र दिसत आहे.

त्यांच्या माहितीमुळे आता पुन्हा वाद निर्माण झाला आहे. त्याच्यावर टिका होत असतांनाच आता प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले यांनीही फेसबुकवर एक पोस्ट करत त्यांच्या विधानावर टिका केली आहे. नाव न घेता त्यांनी या पोस्टच्या माध्यामातुन नेमाडेंच्या वक्तव्यावर टिका केली आहे.

त्यांनी पोस्ट करत लिहिलं, 'एवढ्या मोठ्या लेखकाने अशी दैनंदिनीशी निगडित नसलेली किंवा त्यांनी रोजच्या कार्यक्रमात सुतरामही फरक पडणार नाही अशी विधानं का करावीत?'

आता त्यांची पोस्ट सोशल मिडियावर चर्चेत आली आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी त्यांच्या पोस्टला पाठिंबा दिला आहे तर काहींना नेमाडेंच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे.

वैभव मांगलेंच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

या कमेंट सेक्शनमध्ये एकानं लिहिलं आहे की, 'वैभवजी, मुळात ते काही मोठे साहित्यिक अजिबातच नाहीत... साहित्यक्षेत्रात कुठलं नेमकं भरीव योगदान आहे त्यांचं... वादग्रस्त आणि विघातक लिखाण म्हणजे साहित्य नव्हे...! काहीतरी बरळून स्वतःच्या नावावर साचलेली धूळ झटकण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.' तर दुसऱ्या नेटकऱ्यांने लिहिलयं की, 'थोडं चुकलं असेल पण काही अंशी बरोबरच बोललेत नेमाडे , खासकरून पेशव्यांबद्दल ..' तर एकानं लिहिलं की, 'जसे नट नट्या जिथे आपला तिळमात्र संबंध नाही अशा ठिकाणी देखील नको ते बोलतात तसेच यांचे देखील आहे.'

काय म्हणाले भालचंद्र नेमाडे

भालचंद्र नेमाडे यांनी दोन दिवसांपूर्वी मुघल बादशहा औरंगजेबाबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. औरंगजेबाबद्दल चुकीचं सांगितलं जात. औरंगजेबाने सती प्रथा बंद केली. काशी-विश्वेश्वर येथील पंडित तरुण बायकांना भ्रष्ट करायचे. औरंगजेबाच्या दोन राण्यांना तेथील हिंदू पुजाऱ्यांनी भ्रष्ट केलं होतं आणि ही गोष्ट जेव्हा औरंगजेबाला कळाली तेव्हा त्याने काशी विश्वेश्वराची तोडफोड केली.

त्यानंतर आता मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. नानासाहेब पेशवे जेथे जात तेथे 8 ते 10 वर्षांच्या मुलीची मागणी करत होते. या मुली त्यांना कशासाठी लागायच्या हे त्यांनी सांगितलं नाही. पेशवे म्हणजे दुष्ट आणि नीच वृत्तीचे लोक होते, असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: मुंबईत बेशिस्तपणा वाढला... राज ठाकरेंनी का घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट? सादर केला मुंबईचा विकास आराखडा

Gadchiroli Flood: पूरग्रस्त गडचिरोलीत हाहाकार; मुख्याध्यापकाचा पुराच्या पाण्यात मृत्यू

Temghar Dam : टेमघर धरणग्रस्तांना दोन महिन्यांत मोबदला; न्यायालयाच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून प्रतीक्षा

Mother Daughter Drown : दुर्दैव! मुलीला बुडताना पाहून आई वाचवायला गेली अन् दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्याची वेळ

Birla Group: कुमार मंगलम बिर्ला स्वस्तात शेअर्स का विकत आहेत? एका वर्षापूर्वीच खरेदी केली होती कंपनी

SCROLL FOR NEXT