Vaibhav Tatwawadi dance on lavani song rajasa javali jara basa circuitt movie pramotion sakal
मनोरंजन

Vaibhav Tatwawadi: काय अदा, काय तो नखरा.. वैभव तत्ववादी चक्क लावणीवर थिकरला..

राजसा जवळी जरा बसा.. या लावणीवर वैभवचा खास डान्स..

नीलेश अडसूळ

Vaibhav Tatwawadi lavani: मराठी मनोरंजन विश्वातील तो गोड आणि तितकाच गुणी अभिनेता म्हणून वैभव तत्ववादीकडे पाहिलं जातं. टॉल,डार्क,हॅन्डसम कॅटेगरीत परफेक्ट बसणारा अभिनेता असून त्याचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे.

वैभव हा त्याच्या फिटनेसच्या बाबतीत अत्यंत काटेकोर आहे. त्याने आजवर काही मोजके सिनेमे केले पण जे केले त्यात तो चांगलाच चमकला. अगदी बॉलीवुडमध्येही त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.

त्याचा 'सर्किट' सिनेमा येत्या ७ एप्रिलला आपल्या भेटीस येत आहे. या निमित्तानं वैभव प्रमोशनसाठी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. नुकताच तो स्टार प्रवाह वरील 'मी होणार सुपरस्टार' कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी वैभवने लावणी करून सर्वांनाच चकित केलं. हा व्हिडिओ सध्या बराच व्हायरल होत आहे.

(Vaibhav Tatwawadi dance on lavani song rajasa javali jara basa circuitt movie pramotion)

प्रख्यात निर्माता, दिग्दर्शक मधुर भांडारकर निर्मित, प्रस्तुत "सर्किट" या चित्रपटाची चांगलीच हवा झाली आहे. चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाल्यापासून अल्पावधीत या टीजरला लाखो व्ह्यूज मिळाले असून, या चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेता वैभव तत्त्ववादीनं आपल्या बॉडीबिल्डिंगवर मेहनत घेतल्याचं आलं अन् त्याची जोरदार चर्चा रंगली.

या सिनेमानिमित्तानं तो स्टार प्रवाह वरील एका डान्स शो मध्ये सहभागी झाला होता. यावेळी वैभवला आपली अदाकारी दाखवण्याची संधी मिळाली आणि मग काय वैभवने मैदानच मारलं. नजरेचा बाण, देहबोलीची लचक आणि एखाद्या नृत्यांगनेलाही लाजवेल इतक्या दमदार पणे वैभवने लावणी सादर केली.

या कार्यक्रमातील स्पर्धक श्रीमयी सूर्यवंशी ही दमदार लावणी सादर करते. अगदी अमृता खानविलकरलाही तिच्या लावणीची भुरळ पडली आहे. काल जेव्हा वैभव या कार्यक्रमात आला होता तेव्हा श्रीमयी 'राजसा जवळी जरा बसा..' या लोकप्रिय लावणीवर नाचली. तिच्या सादरीकरणानंतर वैभवदेखील तिच्या सोबत लावणीवर थीरकला. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

वैभवचा डान्स पाहून 'मी होणार सुपरस्टार' ची परीक्षक फुलवा खामकर चक्क उठून मंचावर गेली. आणि काळज घेऊन वैभवला तिठ लावलं. एवढंच नाही तर तो पुरुष असून काय लावणी नाचला हे सर्वांनी बघा अशी ती कौतुकाने म्हंटली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhagad Road Traffic Jam : पुण्यातील सिंहगड रोडवर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा, ऑफिसच्या दिशेने निघालेल्यांना मनस्ताप

Kolhapur Accident Video : कोल्हापूरमध्ये मद्यपी ट्रॅक्टर चालकाने वृद्ध महिलेला उडवलं; व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update : नागपूरच्या भांडेवाडी परिसरात आढळला बिबट्या, वनविभागाच्या वेगवेगळ्या रेस्क्यू सुरु

MPSC Success : संघर्ष ते यशाचे शिखर! सायकलवर भंगार गोळा करणाऱ्या वडिलांच्या कन्येची MPSC त राज्यात पहिली झेप

Mumbai CNG Shortage: सीएनजी कोंडीतून मुंबईकरांची सुटका, पुरवठा सुरळीत होताच पंपांवर गर्दी; ३ दिवसात कोट्यवधींचं नुकसान

SCROLL FOR NEXT