valentine day 2021 special actress Madhuri dixit bipasha basu 
मनोरंजन

Valentine Day 2021: कुणी किस केलंय, कुणी गोंदून घेतलंय; उंचे लोग उची पसंद

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - सेलिब्रेटींचा व्हँलेटाईन डे हा सर्वसामान्य व्यक्तींच्या सेलिब्रेशनपेक्षा वेगळा असतो असे म्हणायला हरकत नाही. सर्वसामान्य विचारही करु शकणार नाही अशा गोष्टी सेलिब्रेटी करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतात. त्यादिवसाच्या निमित्तानं कोणी आपल्या आवडत्या व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू देऊन इंप्रेस करताना दिसते. त्याच्या पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्या पाहणे आणि वाचणे चाहत्यांच्या आवडीचा विषय असतो.

देशात सध्या व्हँलेटाईनचा माहौल आहे. त्यानिमित्तान सकाळपासून बॉलीवूडमधल्या अनेक सेलिब्रेटींनी वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट करुन आपल्या प्रियजनाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. व्हँलेटाईनच्या एकमेकांना शुभेच्छा देताना अनेकांनी आपल्या आवडत्या व्यक्तीला काही महागड्या वस्तूही दिल्या आहेत. आवडत्या सेलिब्रेटींनी कुणाला काय दिले हे जाणून घेण्यातही त्यांच्या चाहत्यांना कमालीचा रस असतो.

बॉलीवूडची धकधक गर्ल प्रसिध्द अभिनेत्री माधुरी दीक्षितनं व्टिटरवरुन आपले पती श्रीराम नेने यांच्या सोबतचा एक फोटो प्रसिध्द केला आहे. त्यात माधुरी आणि श्रीराम हे एकमेकांकडे पाहत असल्याचे दिसून आले आहे. या फोटोबरोबरच माधुरीनं आपल्या फॅन्सना व्हँलेटाईन डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री बिपाशा बसुचा एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. तिनं वेगळ्या अंदाजात व्हँलेटाईन डे साजरा केला आहे. बिपाशानं पती करण सिंह ग्रोवर सोबत एक रोमँटिक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यात ते दोघेजण एकमेकांना किस करताना दिसत आहे. त्या व्हिडिओसोबतच बिपाशानं एक पोस्टही शेअर केली आहे. त्यात तिनं करणला विश केलं आहे. तर अभिनेत्री व्टिंकल खन्नानं इंस्टावर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तिनं सर्वांना व्हँलेटाईनच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दुसरीकडे प्रसिध्द गायिका नेहा कक्करनं सोशल मीडियावर पती रोहनप्रीत सिंहबरोबर एक फोटो शेअर केला आहे. तिनं रोहनच्या नावाचा एक टॅटू बनवला आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Municipal Results: साेलापूर जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये भाजप अपेक्षित यशापासून दूर; चार ठिकाणी विजय, उमेदवार निवडीत चुका नडल्या..

Mohan Bhagwat : भारत एक हिंदू राष्ट्र, हेच सत्य,संवैधानिक मंजुरीची आवश्यकता नाही; मोहन भागवत यांचे मोठे विधान

Latest Marathi News Live Update : 'जी राम जी'वर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली स्वाक्षरी; विधेयकाचं कायद्यात झालं रुपांतर

Ajit Pawar: कोणी सुरुवात केली, तर दुसराही करू शकतो; पक्षप्रवेशाबाबत अजित पवारांचे सूचक वक्तव्य, दिल्लीतील वरिष्ठांशी बाेलेन नेमकं काय म्हणाले?

Satara District Municipality Results: सातारा जिल्ह्यात भाजप धुरंधर! दहापैकी सात पालिकांत सत्ता; राष्ट्रवादीला फटका, महाविकासचा धुव्‍वा..

SCROLL FOR NEXT