valentine day occasion raj kundra shared bedroom secret Shilpa Shetty got surpised  
मनोरंजन

बेडरूममधले सिक्रेट कोण सांगतं का,पण राजनं सांगितलं

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - प्रसिध्दीसाठी कोण काय करील याचा भरवसा नाही. सोशल मीडियावर अशा अनेक प्रकारच्या पोस्ट व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात राजनं जे काही सांगितले त्यावरुन शिल्पानं कानावर हात ठेवले आहेत. शिल्पा आणि राज हे नेहमी एकमेकांची मस्करी करताना दिसून येतात. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जेव्हा त्या दोघांना बोलविण्यात आले तेव्हाही त्यांनी बेधडकपणे आपल्या वैवाहिक नात्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

 शिल्पानं तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यात राजनं त्या दोघांमधील बेडरुम सिक्रेट शेअर केले आहेत. शिल्पानं ज्यावेळी ते ऐकलं तेव्हा तिला धक्काच बसला. बॉलीवूडमधील प्रसिध्द सेलिब्रेटींपैकी एक म्हणून शिल्पा आणि राज यांच्याकडे पाहिले जाते. व्हँलेटाईनच्या निमित्तानं शिल्पानं व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावेळी एका मुलाखतीच्या दरम्यान राजनं काही गोष्टी शेअर केल्या आहेत.

त्या व्हिडिओमध्ये राजला शिल्पा शेट्टी यांची आवडती लव स्टोरीविषयी विचारले. त्यावेळी राजला काही उत्तर देता आले नाही. तेव्हा राजनं फिफ्टी शेडस ऑफ ग्रे नावाची कथा ही शिल्पाची सगळ्यात आवडती कथा आहे असे सांगितले. राजनं दिलेलं उत्तर ऐकून शिल्पा रागावते. तेव्हा राज म्हणतो ते आमच्या बेडरुमचे सिक्रेट होते. त्या व्हिडिओमध्ये शिल्पा आणि राज यांची केमिस्ट्री उत्तम आहे. ते दोघेही नेहमी अशाप्रकारच्या व्हिडिओतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात.

शिल्पानं आणखी काही व्हिडिओ आणि फोटोज शेयर केले आहेत. त्या फोटोंना व्हिडिओ फॉरमॅटमध्ये दाखविण्यात आले आहे. शिल्पा आणि राज यांचे 2009 मध्ये लग्न झाले होते. त्यांना वियान आणि समीशा नावाची दोन मुले आहेत. शिल्पा शेट्टी आता लवकरच हंगामा 2 आणि निकम्मा मध्ये दिसणार आहे. ब-याच वर्षानंतर ती पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. तिचं हे कमबॅक प्रेक्षकांच्या पसंतीस पडते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 
 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रग्ज प्रकरणी सर्वात मोठी कारवाई, १२ हजार कोटींचा माल जप्त; २०० ग्रॅमचा तपास करताना ३२ हजार लीटरपर्यंत पोहोचले पोलीस

Team India: ऋतुराज गायकवाडवर पुन्हा 'अन्याय'! १८४ धावांची खेळी करूनही भारताच्या संघात मिळाले नाही स्थान

India Tallest Ganesha Idol Immersion: भारतातील सर्वात उंच गणपती मूर्तीचे विसर्जन, भक्ती, उत्साह आणि भावनिक निरोपाचा क्षण, पाहा व्हिडिओ

Latest Maharashtra News Updates : केरळमध्ये 'मेंदू खाणारा अमिबा' घेतोय लोकांचा जीव

Ganpati Visarjan 2025 Live Updates : मुंबई आणि पुण्यासह राज्यभरात गणेशभक्तांचा उत्साह

SCROLL FOR NEXT