valentine special jab pyar kiya to daran kya Bollywood real love stories inspire fans 
मनोरंजन

आमचं प्रेम आहे, विषय संपला! मग जग गेलं....

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  प्यार किया तो डरना क्या असे आपण म्हणतो. प्रेम असेल तर कोणी काहीही म्हणालं तरी काही बिघडत नाही. अशीही अनेकांची धारणा असते. बॉलीवूडमध्येही असे काही कपल आहेत की ज्यांना आपलं प्रेम व्यक्त केल्यावर मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं. व्हँलेटाईन डे च्या निमित्तानं त्या प्रेमप्रकरणांना दिलेला उजाळा. काही सेलिब्रेटींनी आपल्यापेक्षा वयानं लहान असणा-या कलाकारांशी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या आहेत. तसे करुन त्यांनी अनेकांचा राग ओढावून तर घेतलाच याशिवाय त्यांच्या करिअरवरही त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले. पण यासगळ्यात हे कलाकार असे होते की, त्यांना आपल्या प्रेमाला कोण काय म्हणाले याच्याशी देणेघेणे नव्हते आणि जगाचा तर त्यांनी विचारच केला नाही. 
 
 शाहरुख खान-गौरी खान - या दोघांच्या प्रेमाविषयी सर्वांनाच माहिती आहे. बॉलीवूडचा बादशाह असणारा किंग खान लव्हर बॉय म्हणूनही प्रसिध्द आहे. केवळ पडद्यावर नाही तर प्रत्यक्षातही तो भलताच रोमँटिक आहे. आपले प्रेम मिळवण्यासाठी त्याने कमालीचा संघर्ष केला. जेव्हा एकदा गौरी नाराज होऊन मुंबईला गेली होती तेव्हा शाहरुखनं पूर्ण मुंबईत तिचा शोध घेतला होता. शेवटी एका समुद्रकिनारी त्यानं तिला फिरताना पाहिले तेव्हा त्याच्या जीवात जीव आला. यानंतर त्यांनी कायम एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.

सैफ अली खान-करीना कपूर - यांच्याबद्दल काही वेगळं सांगण्याची गरज नाही. सैफच अगोदरच अभिनेत्री अमृता सिंगशी लग्न झाले होते. मात्र जेव्हा टशन चित्रपटाच्या सेटवर करिना आणि सैफ एकत्र आले तेव्हा त्यांच्यातील प्रेम फुलले. सैफ हा करिनापेक्षा दहा वर्षांनी मोठा आहे. आपल्या प्रेमाची जाहीर कबूली दिल्यानंतरही तो कुणाला घाबरला नाही. कुणाच्या टीकेला त्यानं उत्तरही दिलं नाही. ते त्याच्या स्वभावाबाहेरचं होतं. काही वर्ष करिनाला डेट केल्यानंतर त्यानं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. 

दीपिका पादुकोण- रणवीर सिंह -  दोघांची जोडी प्रचंड लोकप्रिय आहे. रणवीर तर त्याच्या एनर्जीसाठी प्रसिध्द आहे. रामलीलाच्या सेटवर दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र दीपिका लग्नाबाबत फारशी गंभीर नव्हती. काही दिवस त्यांनी आपलं प्रेम जगासमोर आणण्यास उशीर केला. मीड़ियाचा ससेमिरा चूकवत ते दोघेही एकमेकांना भेटत होते. शेवटी नियतीनं त्यांना एकत्र आणलं. बॉलीवूडमधील प्रभावी जोडी म्हणून त्यांचे नाव घेता येईल.

अर्जुन कपूर - मलायका अरोरा 
बोनी कपूरच्या मुलाचं अरबाज खानच्या पत्नीवर प्रेम जडलं. त्यानंतर त्यांच्या भेटी सुरु झाल्या. ही गोष्ट फार काळ लपून राहिली नाही. बॉलीवूडमध्ये त्या दोघांच्या नावाची चर्चा सुरु झाली. मलायकानंही त्यानंतर अरबाजशी घटस्फोट घेतला. आणि मलायका, अर्जुनच्या प्रेमाच्या गोष्टीला सुरुवात झाली. अनेकांच्या नजरेत ते आयडियल कपल नसेलही. मात्र त्याचा त्यांना काहीही फरक पडलेला नाही. आपलं प्रेम त्यांनी कुणापासून लपवलेलंही नाही. अर्जुनपेक्षा 12 वर्षांनी मोठ्या असणा-या मलायका एका मुलाची आईही आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Robbery: पुण्यात अधिकारीच सुरक्षित नाहीत? मध्यरा‍त्री बंगल्यात घुसून विंग कमांडरच्या तोंडावर हात ठेवला अन् धक्कादायक दरोडा!

​PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी येणार? जाणून घ्या सर्वात महत्वाची अपडेट

Latest Marathi News Live Updates : दडी मारलेल्या पावसाची रत्नागिरीमध्ये दमदार हजेरी

loan waiver: कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा हक्क: राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे, सरकारला दिलेल्या आश्‍वासनाचा पडला विसर

Pune Municipal Corporation: आपत्ती निवारण कक्ष कार्यान्वित; दुसऱ्या टप्प्यातील काम अद्याप शिल्लक

SCROLL FOR NEXT