tiger shroff  
मनोरंजन

टायगर चक्क गाणं म्हणतोयं, 'वंदे मातरम'चा भन्नाट लूक

आपल्या वेगळ्या अंदाजामुळे अभिनेता टायगर श्रॉफ हा नेहमीच चर्चेत असतो.

युगंधर ताजणे

आपल्या वेगळ्या अंदाजामुळे अभिनेता टायगर श्रॉफ हा नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी तो अरबाज खानच्या पिंच नावाच्या शो मध्ये आला होता. त्यावेळी त्यानं काही धक्कादायक खुलासे केले होते. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनाही नवल वाटले. टायरगला त्याच्या दिसण्यावरुन अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे. मात्र त्याचा त्याच्यावर काही एक परिणाम झालेला नाही. अशातच त्याच्या एका नव्या चित्रपटाचा लूक समोर आला आहे. त्यात तो भन्नाट दिसतो आहे. सध्या सोशल मीडियावर त्याच्या या लूकची चर्चा आहे. बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध स्टंटमॅन म्हणून त्यानं आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

त्याचे काय आहे की, आगामी काळात टायगर वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्याच्याकडे अनेक चित्रपट आहेत. त्यापैकी एक वंदे मातरम या गाण्यामध्ये त्याचा वेगळा लूक आपलं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. जॅकी भगनानी आणि टाइगर श्रॉफने टाइगर श्रॉफच्या आवाजात आणि रेमो डिसूजाच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या देशभक्ति एंथम 'वंदे मातरम'चे मोशन पोस्टर नुकतचं प्रदर्शित झालं आहे.

टाइगर श्रॉफसोबत जॅकी भगनानीच्या जे जस्ट म्यूजिकनं आज देशभक्ति एंथम वंदे मातरमचे मोशन पोस्टर प्रदर्शित केले. या गीताला टाइगर श्रॉफने आवाज दिला आहे. हे त्याचे पहिले हिंदी गाणे आहे. या आधी त्याने गायलेली दोन इंग्रजी गाणी, कॅसोनोवा आणि अनबिलीबल यशस्वी ठरली आहेत. हे गाणे 10 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. आज प्रदर्शित करण्यात आलेले हे मोशन पोस्टर देशभक्तिची भावना निर्माण करणारे असून ते तरुणांमध्ये व्हायरल झाले आहे. हे गाणे रेमो डिसूजाद्वारे दिग्दर्शित करण्यात आले आहे.

टाइगर श्रॉफनं गायलेलं हे गाणं रेमो डिसूजानं दिग्दर्शित केलं आहे. विशाल मिश्रा द्वारानं कंपोझ केलं आहे. तर रचित, कौशल किशोर यांनी ते लिहिलं आहे. अंकन सेन, जुईली वैद्य आणि राहुल शेट्टी यांच्याद्वारे कोरियोग्राफ करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT