vanita kharat , vanita kharat wedding SAKAL
मनोरंजन

Vanita Kharat Wedding: वनिता खरात उखाणा घेताना सुद्धा 'हास्यजत्रा' विसरली नाही.. बघा हा झक्कास व्हिडिओ

वनिताने जसा उखाणा घेतला तसा हास्यजत्रेतल्या कलाकारांनी एकच धिंगाणा केला

Devendra Jadhav

Vanita Kharat Ukhana Video: अभिनेत्री वनिता खरात काल विवाहबंधनात अडकली. नातेवाईक व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत वनिताने तिचा बॉयफ्रेंड सुमित लोंढेशी लग्न केलं. हास्यजत्रातील सर्व कलाकार वनिता व सुमितच्या लग्नाला उपस्थित होते. वनिता खरात लग्नात एक झक्कास उखाणा घेतला. या उखाण्यात सुद्धा वनिता महाराष्ट्राची हास्यजत्रा विसरली नाही.

"टेन्शन रिलीज करायला शोधले मी फंडे १७, सुमित तूच माझा महारष्ट्र तूच माझी हास्यजत्रा" असा खास उखाणा वनिताने घेतलाय. वनिता उखाणा घेत असताना महाराष्ट्राची हास्यजत्रा मधले कलाकार तिच्या मागेच उभे होते. वनिताने जसा उखाणा घेतला तसा हास्यजत्रेतल्या कलाकारांनी एकच धिंगाणा केला. एकूणच महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील सर्व कलाकारांनी शूटिंग मधून वेळ काढत वनीताच्या लग्नात एकच धम्माल केली.

वनिताने लग्नासाठी पांढऱ्या रंगाची नऊवारी साडी नेसून मराठमोळ्या लूकमध्ये ती दिसून आली. गुलाबी रंगांचा डिझायनर ब्लाऊज व पैठणी शेल्यात नववधू वनिता नटली. अभिनेत्री प्राजक्ता माळीने दिलेल्या प्राजक्तराजच्या पारंपरिक दागिन्यांमध्ये वनिताचं सौंदर्य आणखी खुलून आलं. सुमितने शेरवानी परिधान करत शाही लूक केला. वनिता व सुमितच्या लग्नाचे काही फोटो समोर आले आहेत.

वनिता आणि सुमितच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वनिता नववधूच्या वेशात खूप सुंदर दिसत आहे. वनिता आणि सुमितच्या लग्नाची सगळीकडेच चर्चा होती. आता अखेर दोघे लग्नाच्या बंधनात अडकले आहेत.महाराष्ट्राची हास्यजत्रेची टीम सुद्धा या दोघांच्या लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी झाली आहे. अगदी रिसेप्शन सोहळ्यात महाराष्ट्राची हास्यजत्राच्या टीमने धम्माल डान्स केला.

मेहंदी, हळद, लग्न आणि शेवटी रिसेप्शन अशा साग्रसंगीत सोहळ्यात वनिताचं लग्न पार पडलं. वनिताने स्वतः सुद्धा लग्नात धम्माल केली. लग्नाच्या वरातीत वनिता कमाल नाचली. महाराष्ट्राची हास्यजत्रा शो च्या माध्यमातुन वनिता आणि गौरव मोरे लोकप्रिय झाले. वनिता खरातचं फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. वनीताच्या लग्नासाठी तिचे फॅन्स देखील तितकेच उत्सुक होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shikhar Dhawan: कायदेशीर सामना धवनने जिंकला! पहिल्या बायकोकडून मिळणार ५.२ कोटी, आयेशासाठी वाढल्या अडचणी

Holi 2026: होळीवर ग्रहणाचा वेळ किती असेल? भद्रा कधीपर्यंत राहील, होलिका दहनाचा मुहूर्त येथे जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : दुष्ट आणि अनैतिक व्यक्तीला शंकराचार्य म्हणणे हा सनातन धर्माचा घोर अपमान

Agricultural News : कांदा उत्पादकांसाठी गुड न्यूज! निर्यात शुल्कातील जाचक अटी हटवल्या; आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धा कायम राहणार

Kagal Accident : पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात; कागलच्या ३६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

SCROLL FOR NEXT