Vanita Kharat Maharashtrachi Hasyajatra fame husband sumit londhe comment viral on her photo in canada  SAKAL
मनोरंजन

Vanita Kharat: मी एक व्हिडीओ बनवुन दिलाय त्याचं... वनिता खरातच्या नवऱ्याने सर्वांसमोर करुन दिली आठवण

वनिताचा नवरा सुमीतने बायकोच्या फोटोवर कमेंट करत सर्वांचं लक्ष वेधलंय

Devendra Jadhav

Vanita Kharat News: वनिता खरात ही महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील महत्वाची अभिनेत्री. वनिता खरात सोशल मिडीयावर अनेकदा सक्रिय असते. वनिताला आपण महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये आजवर विविध भुमिकांंमध्ये पाहिलंय.

वनिता सोशल मिडीयावर तिचे सुंदर फोटो शेअर करत असते. वनिताने नुकताच एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोवर तिच्या नवऱ्याने एक कमेंट केलीय, ती व्हायरल झालीय.

(Vanita Kharat Maharashtrachi Hasyajatra fame husband sumit londhe comment viral)

वनिताच्या नवऱ्याने करुन दिली खास आठवण

वनिताने सोशल मिडीयावर एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोत वनिताच्या हातात गुलाब दिसतंय. वनिताने गुलाबो 2.0 असं कॅप्शन या फोटोला दिलंय. कॅनडाला वनिताने हे फोटो काढलेत. ता. क.-( हे वाढदिवशी काढलेले फोटो आहेत पण वाढदिवसाची पोस्ट अजून बाकी आहे) असं कॅप्शन देत वनिताने हे फोटो पोस्ट केलेत.

या पोस्टखाली वनिताच्या नवऱ्याने कमेंट केलीय की, मी पण व्हिडीओ बनवुन दिला आहे वाढदिवसाचा. अशी कमेंट केलीय. यावर वनिताने तो पण Upload करणार अशी कमेंट करत हसण्याचे Emoji पोस्ट केलीय.

एकुणच यावरुन असं दिसतं की, वनिताचा नवरा सुमित लोंढेने तिचा बर्थडे स्पेशल एक व्हिडीओ शूट केलाय. पण तो वनिताने वाढदिवस उलटून गेला तरीही अपलोड केला नाहीय

कधी सुरु होणार हास्यजत्रा?

महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचा नवीन प्रोमो रिलीज झालाय. या ब्लॅक अँड व्हाईट प्रोमोत दत्तु मोरे, ईशा डे, शिवाली परब, प्रियदर्शनी इंदलकर, समीर चौगुले आणि वनीता खरात दिसत आहेत.

पोट धरून आणि पोट भरून हसवण्यासाठी तुमचे लाडके विनोदवीर आहेत तयार! ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत’ तुमचं सहकुटुंब स्वागत… पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' - सहकुटुंब हसू या! असं कॅप्शन देत हा प्रोमो शेअर करण्यात आलाय

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो 14 ऑगस्टपासून, सोम.-गुरु., रात्री 9 वा. सोनी मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातचं वर्कफ्रंट

वनिता आता रोहित शेट्टीच्या पहिल्या मराठी सिनेमात म्हणजेच स्कुल, कॉलेज आणि लाईफ सिनेमात वनिता खरात झळकणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला.

याशिवाय जानेवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या सरला एक कोटी सिनेमात वनिता खरात झळकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain Like Alcohol: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT