Vanita Kharat,Gaurav More -Maharashtrachi Hasyajatra Actors Esakal
मनोरंजन

Vanita Kharat: 'हास्यजत्रे'च्या मंचावर गौरव मोरेच 'या'बाबतीत मास्टर..' वनिता खरातनं सांगितलं सीक्रेट

ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत वनितानं आपल्या वैयक्तिक तसंच प्रोफेशनल आयुष्याविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.

प्रणाली मोरे

Vanita Kharat: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात ही सध्या सोशल मीडियावरील सगळ्यात जास्त ट्रेन्डिंगमध्ये असलेली अभिनेत्री आहे. वनिता ज्या पोस्ट करते त्या सगळ्याच व्हायरल होतात. 'बुलेट ट्रेन' सारखा शो असो ..नाटक असो..की 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ते अगदी बॉलीवूडमध्ये 'कबीर सिंग' सिनेमातील छोटीशी भूमिका असो वनितानं सगळीकडे आपलं नाणं खणखणीत वाजून दाखवलं.

पण यामागे मोठं स्ट्रगल होतं हे विसरुन चालणार नाही. ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत वनितानं आपलं स्ट्रगल सांगतानाच आजही रिजेक्शनचा सामना होतो तेव्हा ते ती कसं हॅंडल करते याविषयी आणि अशा अनेक वैयक्तिक तसंच प्रोफेशनल गोष्टींविषयी मनमोकळा संवाद साधला आहे.

ईसकाळला दिलेल्या मुलाखतीत वनितानं हास्यजत्रेतील स्कीट दरम्यानचे काही सीक्रेट्स,..आपलं पहिलं ऑडिशन,.ओंकार भोजनेचं शो सोडून जाणं अशा अनेक गोष्टींवर मनमोकळा संवाद साधला आहे.(Vanita Kharat marathi actress marathi comedy show maharashtrachi hasyajatra)

वनिता खरात सध्या सोशल मीडियावर सक्रिय पहायला मिळते. ती अनेकदा पोस्ट करते त्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसतात. सोशल मीडियावरील ट्रोलिंगला घेऊन वनितानं या पॉडकास्ट मुलाखतीत स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

वनितानं सुंदरता म्हणजे नेमकं काय याची आपली अशी एक व्याख्या सांगताना महिलांना स्वतःकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन दिला आहे. हास्यजत्रेमुळे प्रसिद्धि मिळाली पण रिजेक्शन आजही वाट्याला येतं तेव्हा नेमकं आपण काय करतो यासंदर्भातही वनितानं भाष्य केलं आहे. तेव्हा ते ऐकण्यासाठी आपल्याला बातमीत जोडलेली मुलाखतीची लिंक नक्की ऐका.

वनितानं याच पॉडकास्ट मुलाखतीत आपला सहकलाकार गौरव मोरेचं हास्यजत्रेतील मंचावरचं एक सीक्रेट शेअर केलं आहे. नेमकं काय म्हणाली आहे वनिता गौरव मोरेच्या त्या सीक्रेटविषयी ते ऐकण्यासाठी मात्र आपल्याला ही पॉडकास्ट मुलाखत ऐकावी लागेल.

ओंकार भोजने अन् वनिताची घनिष्ट मैत्री आहे. नुकताच हास्यजत्रा सोडल्यानंतर ओंकार वनिताच्या सासरी तिला भेटायला आणि शुभेच्छा द्यायला गेला होते तेव्हाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता .

पॉडकास्ट मुलाखतीत वनितानं ओंकारनं हास्यजत्रा सोडण्यामागचं काय कारण असू शकतं हे सांगतानाच ज्यावेळी ओंकारनं पहिल्यांदा तिला त्याचा निर्णय सांगितला होता तेव्हा ती त्याला काय म्हणाली होती हे देखील शेअर केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT